________________
अहिंसा
दादाश्री : तो गुन्हाच म्हटला जाईल ना! आपला जेवढा गुन्हा असेल तेवढी आपल्याला शिक्षा मिळते. जितक्या कमी परिग्रहाने जगता येईल, ते जीवन उत्तम आहे.
सामना, पण शांतीपूर्वक प्रश्नकर्ता : चोरी करू नये, हिंसा करू नये, असे आपण सांगता. पण समजा एखाद्या व्यक्तीने आपली वस्तू चोरली, आपली फसवणूक केली. तर आपण त्याचा सामना केला पाहिजे की नाही?
दादाश्री : सामना करायलाच पाहिजे, परंतु आपण असा सामना करु नये की ज्यामुळे आपले मन बिघडेल. अगदी शांतपणे आपण त्याला सांगितले पाहिजे की, 'भाऊ मी तुमचे काय बिघडवले की ज्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर असे करत आहात?' आपले शंभर रुपये चोरले असतील आणि आपण त्याच्यावर रागावलो तर त्या शंभर रुपयांसाठी आपले पाचशे रुपयांचे नुकसान केले. म्हणजे शंभर रुपयांसाठी पाचशे रुपयांचे नुकसान करु नये. आपण शांतपणे बोलायचे. रागवायचे नाही.
हिंसेचा विरोध, वाचवते अनुमोदनेपासून... प्रश्नकर्ता : मानसिक दुःख देणे, कोणाला फसवणे, विश्वासघात करणे, चोरी करणे वगैरे सूक्ष्म हिंसा म्हटली जाते का?
दादाश्री : ती सर्व हिंसाच आहे. स्थूल हिंसेपेक्षा ही हिंसा मोठी आहे. याचे खूप भयंकर फळ येते. कोणाला मानसिक दुःख देणे, कोणाची फसवणूक करणे, विश्वासघात करणे, चोरी करणे हे सर्व रौद्रध्यान म्हटले जाते आणि रौद्रध्यानाचे फळ नर्कगती आहे.
प्रश्नकर्ता : परंतु त्या सूक्ष्म हिंसेलाच महत्त्व देऊन मोठी द्रव्यहिंसा, मुक्या प्राण्यांप्रति क्रुरता, हत्या आणि त्यांच्या शोषणाने किंवा हिंसेने मिळवण्यात येणाऱ्या सामग्रीचा वापर करणे, किंवा त्यास प्रोत्साहन