________________
अहिंसा
भरती झाला आणि तो मारला गेला तर माझी मुलगी विधवा होईल.' मग तर आपल्या देशात असे कोणी जन्माला येणारच नाही. पण नाही, अशी माणसेही प्रत्येक देशात असतातच नैसर्गिक नियमच असा आहे. म्हणजे हे सर्व निसर्गच उत्पन्न करत असते. यात काही नवीन नाही. यामागे निसर्गाचा हात आहे. म्हणून जास्त काळजी करण्याची गरज नाही.
साठा करणे ही सुद्धा हिंसाच प्रश्नकर्ता : व्यापारी नफाखोरी करतो, एखादा उद्योपती किंवा व्यापारी मेहनतीच्या मानाने कमी पैसे देतो, तसेच कोणी मेहनतीशिवाय कमाई करतो, त्यास हिंसाखोरी म्हटली जाईल का?
दादाश्री : ती सर्व हिंसाखोरीच आहे.
प्रश्नकर्ता : आता अशा प्रकारे फुकटची कमाई करून धर्मकार्यात पैसे वापरतो, यास कोणत्या प्रकारची हिंसा म्हटली जाईल?
दादाश्री : जेवढे पैसे धर्मकार्यात खर्च केले, जेवढ्या पैशांचा त्याग केला, तेवढा दोष कमी लागला. समजा लाख रुपये कमावले होते, त्यातून ऐंशी हजाराचा दवाखाना बांधला तर तेवढ्या पैशांची जवाबदारी त्याची राहिली नाही. त्याच्यावर फक्त वीस हजार रुपयांचीच जबाबदारी राहिली. म्हणजे हे चांगले आहे, वाईट नाही.
प्रश्नकर्ता : लोक लक्ष्मीला साठवून ठेवतात यास हिंसा म्हटली जाणार की नाही?
दादाश्री : हिंसाच म्हटली जाईल. साठवणे ही हिंसाच आहे. कारण दुसऱ्या लोकांच्या कामास येत नाही ना!
प्रश्नकर्ता : लक्जुरीयस लाइफ (ऐशोआरामवाले जीवन) जगण्यासाठी संहार करून अधिक लक्ष्मी प्राप्त करतात, यास काय म्हटले जाईल?