________________
अहिंसा
तुम्ही घेता? हो, जरी दोन तोळे वजन असेल ! अरे, हे जीवन आहे ? त्या किड्यांचे वजन असते एखाद तोळे ! त्या वजनाचेही पैसे घेतले.
उत्तम धंदा, जवाहिऱ्याचा
म्हणजे खऱ्या पुण्यवंताला कोणता धंदा मिळतो ? ज्यात सर्वात कमी हिंसा असेल असा धंदा पुण्यवंताला मिळतो. तर आता असा धंदा कोणता? तो म्हणजे हिरे - माणिकाचा की ज्यात काहीच भेसळ नाही. हल्ली तर त्यात सुद्धा चोरीची सुरुवात झाली आहे. पण ज्याला भेसळ नसलेला धंदा करायचा असेल तो हा धंदा करू शकतो. त्यात जीवजंतु मरत नाहीत. कसलीच उपाधी नाही. यानंतर दुसऱ्या नंबरवर सोन्याचांदीचा. आणि सर्वात भयंकर हिंसक धंदा कोणता ? तो म्हणजे खाटीकाचा. नंतर कुंभाराचा. ती भट्टी पेटवतात ना! म्हणजे ही सगळी हिंसाच आहे.
२८
प्रश्नकर्ता : हिंसा कुठल्याही प्रकारची असो पण त्याचे फळ तर मिळतेच ना ? हिंसेचे फळ तर भोगावेच लागते ना ? मग ती भावहिंसा असो किंवा द्रव्यहिंसा असो ?
दादाश्री : लोक भोगतच आहेत ना ! दिवसभर नुसता मनस्ताप,
मनस्ताप...
जेवढेही हिंसक व्यापार करणारे आहेत ना, ते व्यापारी सुखी दिसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही तेज येत नाही. जमीन मालक स्वतः नांगर चालवत नसेल तर त्याला जास्त स्पर्शत नाही, परंतु नांगरणाऱ्याला स्पर्शते, म्हणून तो सुखी नसतो. पूर्वीपासूनचा असा नियम आहे. म्हणजे 'धीस इज बट नॅचरल' (हे नैसर्गिकच आहे) असा धंदा मिळणे आणि हे सर्व नैसर्गिक आहे. तुम्ही धंदा बंद करायचे म्हटले ना, तरीही तो बंद होऊ शकेल असे नाही. कारण त्यात कोणाचे काहीही चालत नाही. नाही तर सगळ्याच लोकांच्या मनात विचार येईल की, 'मुलगा (जावई) सैन्यात