________________
अहिंसा
२७
हिंसक व्यापार प्रश्नकर्ता : पूर्वी जेव्हा ते जंतुनाशक औषधांचा धंदा करत होते, तेव्हा ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नव्हती, असेच वाटायचे की कर्माच्या हिशोबाने जो धंदा नशिबी आला आहे त्यात काय वाईट आहे? कोणाच्या वाट्याला मटण विकण्याचे आले तर त्यात त्याची काय चूक? त्याच्या कर्माच्या हिशोबाने जे होते तेच आले आहे ना?
दादाश्री : हे असे आहे, की जर आत शंका वाटली नसती तर तसेच चालत राहिले असते. पण त्यांच्या पुण्याईमुळे त्यांना ही शंका आली. जबरदस्त पुण्य आहे. नाही तर जडता आली असती. तिथे कित्येक जीव मेले ते कमी झाले नाहीत, तुमच्या आतच जीव मरतात आणि त्यामुळे जडता येते. जागृती बंद होते. मंद होते.
प्रश्नकर्ता : अजूनही मला पूर्वीचे सगळे जुने मित्र भेटतात, तर मी त्या सर्वांना सांगतो की, तुम्ही यातून बाहेर निघा. त्यांना पन्नास उदाहरणे देऊन समजावले की बघा मी इतकी उच्च प्रगती करूनही खाली घसरलो. परंतु सगळ्यांच्याच डोक्यात हे बसत नसेल! म्हणून मग शेवटी ठोकर खाऊन सगळे त्यातून बाहेर निघाले.
दादाश्री : म्हणजे किती पाप असेल, तेव्हा हा असा हिंसक धंदा करण्याचे आपल्या वाट्याला येते. असे आहे की जर, आपण ह्या हिंसक कामातून सुटलो तर उत्तम. दुसरे पुष्कळ धंदे असतात. एकदा एक माणूस मला म्हणाला होता, की माझ्या सगळ्या धंद्यांपेक्षा हा किराण्याचा धंदा खूप फायदेशीर आहे. मी त्याला समजावले की, जेव्हा ज्वारी, बाजरी आणि इतर सगळ्या धान्यात कीडे पडतात तेव्हा तू काय करतोस? त्यावर तो म्हणाला त्यात आम्ही काय करणार? आम्ही ते चाळून टाकतो, साफसूफ करतो, काळजी घेतो. सर्व काही करतो. पण तरीही त्यात किडे राहतातच, मग आम्ही काय करु? मी म्हणालो, 'किडे राहतात त्यास आमची हरकत नाही, परंतु वजन करताना धान्याबरोबर किड्यांचेही पैसे