________________
२४
अहिंसा
शेती करताना पाप तर बांधलेच जात असते. पण हे पाप बांधतेवेळी आम्ही तुम्हाला औषध (उपाय) देतो की, त्यावेळी तुम्ही असे बोला. म्हणजे पाप कमी होतील. आम्ही पाप धुण्याचे औषध देतो. औषध नको का? शेतात गेलात म्हणजे नांगरणे-वखरणे यात पाप तर होणारच. त्यात कितीतरी जीव मारले जातात. ऊस कापतात त्यास पाप नाही का म्हटले जाणार? ते सर्व जीवच आहेत ना बिचारे? पण त्यासाठी काय करावे ते आम्ही तुम्हाला समजावतो, जेणे करुन तुम्हाला कमी दोष लागतील आणि भौतिक सुख चांगल्याप्रकारे उपभोगू शकाल.
शेतीची कामे करताना जीवजंतु मरतात, त्याचा दोष तर लागतो ना? म्हणून शेती करणाऱ्यांनी दररोज पाच-दहा मिनिटे देवाला प्रार्थना करावी की, हे दोष झाले त्याची माफी मागतो. शेतकरी असेल त्याला सांगावे की तू हा व्यवसाय करतो त्यात कित्येक जीवजंतु मरत असतात. त्याचे तू अशाप्रकारे प्रतिक्रमण कर जा. तू जे चुकीचे काम करतोस, त्यास माझी हरकत नाही. पण त्याचे तू अशा प्रकारे प्रतिक्रमण कर.
स्वरूपज्ञानीला पुण्य-पाप स्पर्शतनाही प्रश्नकर्ता : आम्ही जंतुनाशक औषध तयार करतो आणि मग ते शेतात फवारतो, त्यामुळे बरेच जीव मारले जातात. तर त्याचे पाप लागते की नाही लागत? आणि ते औषध तयार करणे यास पाप म्हटले जाणार का?
दादाश्री : हो. कारण ते औषध जीवांना मारण्याच्या हेतूनेच बनवले जाते. औषध आणतात तेही जीवांना मारण्याच्या हेतूनेच आणतात आणि ते पिकांवर फवारतात ते सुद्धा जीवांना मारण्याच्या हेतूनेच फवारतात. म्हणून हे सर्व पापच आहे.
प्रश्नकर्ता : पण यात पिकांची चांगली वाढ व्हावी व भरपूर उत्पन्न मिळावे असा हेतू असतो.