________________
अहिंसा
दादाश्री : असे आहे, की हे पिक कशाच्या आधारावर होत असते, शेतकरी कशाच्या आधारावर शेत नांगरतो, कशाच्या आधारावर पेरतो, हे सगळे कशाच्या आधारावर चालते ते मला माहीत आहे. या सगळ्या गोष्टींचे रहस्य माहीत नसल्यामुळे लोकांना असे वाटते की 'हे तर माझ्यामुळेच होते. हे मी औषध फवारले म्हणून ते पिक वाचले.' आता हा आधार देणे (असे मानणे) हेच भयंकर मोठे पाप आहे. आणि निराधार झाले म्हणजे ते सर्व गळून पडते.
प्रश्नकर्ता : तर मग पुरुषार्थ कुठे गेला?
दादाश्री : खरा पुरुषार्थ तर, जे काही होत आहे त्यास पाहणेजाणणे हाच पुरुषार्थ आहे, दुसरे काही नाही. मनात विचार येतात ती 'फाईल' आहे. विचारांना तर तुम्ही पाहायचे. दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही.
प्रश्नकर्ता : मग ही शेती करायची की नाही? दादाश्री : शेती करण्यास हरकत नाही. प्रश्नकर्ता : पण त्याने पापाचे ओझे वाढते त्याचे काय?
दादाश्री : असे आहे, या ज्ञानानंतर तुम्हाला पाप शिवत नाही ना! आता तुम्ही 'चंदुभाऊ' राहिले नाही. तुम्ही 'चंदुभाऊ' असाल तोपर्यंत पाप शिवते. 'मी चंदुभाऊ आहे' असे तुम्हाला नक्की वाटते का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तर मग पाप कसे काय स्पर्श करणार? हे चार्जच होणार नाही ना! आपल्याजवळ जी शेती आहे तिचा निकाल करावा. ती 'फाईल' आहे. समोर आलेल्या फाईलींचा समभावे निकाल करावा.
परंतु जर माझ्या सांगण्याप्रमाणे 'मी शुद्धात्मा आहे' अशी जागृती सतत राहत असेल तर मग त्याने कितीही औषध मारले तरी त्याला