________________
अहिंसा
रोपट्यांचा कोंब तोडून टाकावा परंतु मनापासून हा असा धंदा माझ्या वाट्याला का आला, असा पश्चाताप झाला पाहिजे. असे करायला नको, अशी मनात खंत वाटली पाहिजे, बस.
२३
प्रश्नकर्ता : पण हे पाप तर होतच राहणार ना ?
दादाश्री : ते तर आहेच. ते तुम्ही पाहायचे नाही. हे जे पाप होत आहे त्यास पाहायचे नाही. तुम्ही तर असेच ठरवायचे की माझ्याकडून असे होऊ नये, असा निश्चय करायला हवा. हा असा धंदा माझ्या वाट्याला कसा आला? दुसरा चांगला व्यवसाय मिळाला असता तर आम्ही असे केले नसते. पूर्वी पश्चाताप होत नव्हता. जोपर्यंत असे जाणले नव्हते तोपर्यंत पश्चाताप होत नाही. उलट खुश होऊन रोपट्याला उपटून फेकायचो. तुम्ही आमच्या सांगण्याप्रमाणे करा ना. मग तुमची सर्व जबाबदारी आमची. रोपटे फेकून दिले त्यास हरकत नाही पण पश्चाताप झाला पाहिजे की हे माझ्या वाट्याला कुठून आले ?
प्रश्नकर्ता : समजलो.
दादाश्री : या शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी जास्त पाप करतात. आणि ह्या व्यापाऱ्यांपेक्षा हे घरी बसून राहणारे अधिक पाप करतात. पाप तर मनाने होत असते, शरीराने पाप होत नसते. तुम्हाला ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. इतर लोकांना हे समजण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्यापुरते समजून घ्या. इतर लोक जे समजतात ते त्यांच्यासाठी बरोबर आहे.
प्रश्नकर्ता : कपाशीला औषधाची फवारणी मारावी लागते तर काय करावे ? त्यातही हिंसा तर होतेच ना ?
दादाश्री : नाइलाजाने जी-जी कार्ये करावी लागतात, ती प्रतिक्रमण करण्याच्या उद्देशाने करावीत.
तुम्हाला या संसार व्यवहारात कसे चालावे ते जमत नाही. ते आम्ही तुम्हाला शिकवतो. म्हणजे नवे पाप बांधले जाणार नाही.