________________
अहिंसा
दादाश्री : त्याचे असे आहे, एक कार्य करतात त्यात पुण्य आणि पाप दोन्हीही सामावलेले असतात. हे शेतकरी शेती करतात तेव्हा एका रोपट्याला उपटून टाकतात आणि जे रोप कामाचे असते त्याला वाढवतात. यात त्या रोपट्याला वाढविल्याबद्दल खूप पुण्य बांधले जाते आणि जे रोप उपटून टाकतात, त्याचे त्यांना पाप लागते. हे पाप पंचवीस टक्के बांधले जाते आणि पुण्य पंच्याहत्तर टक्के बांधले जाते. म्हणजे पन्नास टक्क्यांचा फायदा झाला ना!
प्रश्नकर्ता : म्हणजे मग ते पाप आणि पुण्य 'प्लस-मायनस' (वजा-बेरीज) होते का?
दादाश्री : नाही. ते 'प्लस-मायनस' करण्यात येत नाही. वहीखात्यात तर दोन्हीही लिहिले जाते. जर असे 'प्लस-मायनस' झाले असते ना तर कोणाकडे थोडे सुद्धा दु:ख राहिले नसते. मग तर कोणी मोक्षाला सुद्धा गेला नसता. तो तर म्हणेल 'इथेच चांगले आहे, इथे काहीच दुःख नाही.' लोक तर खूप पक्के असतात. पण असे काही घडत नाही. जग पापातही आहे आणि पुण्यातही आहे. पापासोबत पुण्यही होत राहते. पण भगवंताने काय सांगितले की लाभालाभाचा व्यापार करा.
स्पेशल प्रतिक्रमण, शेतकऱ्यांसाठी प्रश्नकर्ता : मी आपल्या पुस्तकात वाचले होते की 'प्राप्त मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो ‘परंतु आम्ही ठरलो शेतकरी, आम्ही तंबाखूचे पिक घेतो तेव्हा आम्हाला प्रत्येक रोपट्याचा कोंब म्हणजे त्याचे डोके तोडावेच लागते. मग यामुळे त्या रोपट्याला दुःख तर होतेच ना? त्याचे पाप तर लागेलच ना? लाखो रोपट्यांची डोकी (शेंडे) चिरडून टाकतो. मग या पापाचे निवारण कशा प्रकारे करावे?
दादाश्री : यासाठी तर मनात अशी खंत वाटली पाहिजे की जळो, असा धंदा करण्याचा योग माझ्या वाट्याला कुठून आला? बस एवढेच.