________________
अहिंसा
दादाश्री : निमित्ताची हरकत नाही. जग निमित्तरूपच आहे. आपण त्या एकेंद्रिय जीवांना दु:खं देत नाही. बाकी, असे तर चालतच राहणार. ज्या एकेंद्रिय जीवांची चिंता करायची नाही तिथे गोंधळ घालून दिला. पण रस्त्याने जाताना विनाकारण झाडाची पाने तोडू नका, अनर्थक क्रिया करू नका. आणि दात घासण्यासाठी दातवण हवे असेल तर तुम्ही झाडाला म्हणावे की, 'मला काडीचा एक तुकडा हवा आहे.' असे मागून घ्यावे.
प्रश्नकर्ता : एक माणूस फुटपाथवर चालत असेल, दुसरा माणूस गवतावर चालत असेल. यात फरक तर आहेच ना?
दादाश्री : हो, पण त्यात जास्त फरक नाही. हे तर लोकांनी डोक्यात उलटे भरवले. मोठया गोष्टी राहून गेल्या आणि लहान गोष्टींना अधिक महत्त्व दिले गेले. लोकांवर चिडणे यास मोठी हिंसा म्हटली आहे. कारण समोरच्याला दु:ख होते ना!
नियम, शेतीत पुण्य-पापाचा प्रश्नकर्ता : शेतकरी शेती करतात त्यात पाप आहे का?
दादाश्री : सगळीकडे पाप आहे. शेतकरी शेती करतात त्यातही पाप आहे आणि धान्य विकण्याचा धंदा करतात त्यातही पाप आहे. धान्यात किडे पडतात की नाही पडत? आणि लोक किड्यांसकट बाजरी विकतात. अरे, धान्यासोबत किड्यांचेही पैसे घेतले, आणि ते खाल्ले!
प्रश्नकर्ता : पण शेती करणाऱ्याला एका रोपाचे जतन करावे लागते आणि दुसऱ्या रोपाला उपटून टाकावे लागते. मग यातही पाप आहे का?
दादाश्री : आहेच ना! प्रश्नकर्ता : मग शेतकरी शेती कशी करतील?