________________
अहिंसा
करतात की तुम्ही या फुलपाखरांना पकडा आणि अशा प्रकारे अल्बम तयार करा, मग त्यांना काहीच पाप लागत नाही?
दादाश्री : त्यांच्या वाट्यासही येते. प्रेरणा देणाऱ्याच्या वाट्याला साठ टक्के आणि करणाऱ्याला चाळीस टक्के, असे विभागले जाते.
प्रश्नकर्ता : कुठलीही घटना घडत आहे ती व्यवस्थित शक्तीच्या नियमानुसार बरोबर आहे असे नाही का म्हटले जाणार? ते निमित्त बनले आणि त्यांना करावे लागले. तर मग त्यांच्या वाट्याला पाप का आले?
दादाश्री : पाप तर एवढ्यासाठीच लागते की, असे काम आपल्या वाट्यास नसावे. तरी सुद्धा आपल्या वाट्यास आले? बकरे कापण्याचे काम आपल्या वाट्यास आले तर बरे वाटेल का?
प्रश्नकर्ता : बरे तर वाटत नाही. पण दादा, करावेच लागेल असे असेल तर? नाइलाजास्तव करावेच लागते. त्याशिवाय सुटकाच नसेल
तर?
दादाश्री : करावे लागले तर... पश्चातापपूर्वक करावे लागले तरच कामाचे. रोज एक तास पश्चाताप करावा लागेल, तू एक कीटक बनवून दे, बघु? फॉरेनचे सायन्टिस्ट तरी बनवू शकतील का एक कीटक?
प्रश्नकर्ता : नाही, ते तर शक्यच नाही ना, दादा! दादाश्री : आपण बनवू शकत नाही मग त्यांना मारू कसे शकतो?
या सर्व लोकांनी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की हे असे काम कुठून आले आमच्या वाट्याला... शेतीचे काम का म्हणून आले... शेतीच्या कामात तर निव्वळ हिंसाच आहे पण ती अशा प्रकारची नाही, आणि ही तर उघडपणे हिंसा आहे.
प्रश्नकर्ता : फुलपाखरांना मारून खूप चांगला नमुना घेऊन येतो. आणि वर खुश होतो की, मी कसे मारून आणले, किती छान नमुना