________________
अहिंसा
प्रश्नकर्ता : परंतु तो तर करुणेच्या भावनेने करतो.
दादाश्री : करुणा असो की काहीही असो. आणि तो पापही बांधेल.
प्रश्नकर्ता : मग काय करावे? कितीही घाण पाणी असले तरी ते प्यायचे?
दादाश्री : यात काही चालणारच नाही. तो अहंकार केल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला स्वच्छ शुद्ध पाणीच मिळत राहणार. एखादा अहंकारी तुम्हाला ते स्वच्छ करूनच देईल. हो जगात प्रत्येक वस्तू आहे. अशी कुठलीही वस्तू नाही की जी मिळणार नाही. पण ती मिळण्यास फक्त तुमचे पुण्य कमी पडत आहे. जेवढा तुमचा अहंकार असेल तेवढे अंतराय (विघ्न) येतात. अहंकाराचे निर्मूलन झाले की प्रत्येक वस्तू तुमच्या घरी हजर असेल. या जगातील अशी कुठलीही वस्तू नसेल की ती तुमच्या घरी नसेल! अर्थात अहंकारच अंतरायरुप आहे.
शिक्षणात हिंसा? प्रश्नकर्ता : हा कृषी विद्यालयात शिकत आहे, इथला विद्यार्थी आहे, तो म्हणतो की, आम्हाला शिकण्यासाठी फुलपाखरू पकडावे लागतात. आणि त्यांना मारावे लागते, तर त्यामुळे पाप लागते का? फुलपाखरू पकडले नाही तर आम्हाला परीक्षेत मार्कस् मिळत नाहीत, मग आम्ही काय करावे?
दादाश्री : त्यासाठी दररोज एक तास देवाला प्रार्थना करा की हे देवा, माझ्या नशिबी असे कसे आले? सर्वांनाच काय असे असते ?! तुझ्या वाट्याला आले म्हणून तू देवाला प्रार्थना कर की, 'हे देवा मी क्षमा मागतो. आता पुन्हा कधी माझ्या वाटयाला असे येणार नाही असे करा.'
प्रश्नकर्ता : म्हणजे, यात जे प्रेरणा देणारे शिक्षक असतात ते प्रेरित