________________
अहिंसा
१७
प्रश्नकर्ता : म्हणजे प्रत्येकाच्या भावनेवर अवलंबून आहे?
दादाश्री : हो, ज्याची जशी भावना असेल त्यानुसार त्याची जोखीमदारी!
प्रश्नकर्ता : समजा पाण्याची टाकी आहे, त्यात उंदीर मेला असेल किंवा कबुतर मेले असेल, तर त्या टाकीची साफसफाई करावी लागते, साफसफाई केल्यानंतर त्यात औषध वगैरे टाकावे लागते किंवा म्युनिसिपालिटीवाल्यांना बोलवून औषध मारून घेतो. जेणेकरुन त्या सर्व जीवजंतुंचा नाश होईल ना? तर ते पापच झाले ना? मग त्या पापाचे बंधन कोणाला लागते? करणाऱ्याला की करविणाऱ्याला?
दादाश्री : करणारा आणि करविणारा दोघांच्याही वाट्याला येते. पण तसा आपला भाव नसावा. आपला असा अभिप्रायही नसावा.
प्रश्नकर्ता : घाण मिटविण्याचा भाव आहे. कारण असे घाण पाणी प्यायले तर सगळ्यांना त्रास होईल, ते आजारी पडतील.
दादाश्री : हो, पण तो दोष तर लागेलच ना! हे तर असे आहे की, जर असे दोष मोजत बसलो ना, तर या जगात निरंतर दोष होतच राहतात.
तेव्हा तुम्ही दुसऱ्यांची काळजी करु नका. तुम्ही तुमचे सांभाळा. 'सब सबकी संभालो.' प्रत्येक जीव जन्माला येताना आपापले मरण वगैरे सर्व सोबतच घेऊन आलेला असतो. म्हणूनच भगवंताने सांगितले की कोणी कोणाला मारू शकत नाही. पण ही गोष्ट ओपन (उघड) करू नका, नाही तर लोक याचा दुरुपयोग करतील.
__ घरात दहा माणसं राहत असतील आणि पाण्याची टाकी खराब झाली असेल, तेव्हा टाकी साफ करण्यास कोण जातो? ज्याच्यात अहंकार असतो तोच जातो. तो म्हणेल की, 'मी स्वच्छ करेन, हे तुमचे काम नाही.' म्हणजे अहंकारी असेल त्याला दोष लागतो.