________________
अहिंसा
असे मारतात का? मोठे शूरवीर म्हणायचे ना! म्हणजे लोक मारण्यात कसे शूर! आणि हे कोणाचे सर्जन आहे की तुम्ही विसर्जन करायला तयार होतात?! तुम्ही ज्याचे सर्जन करु शकता त्याचेच विसर्जन करु शकता. काही न्याय असेल की नाही?
असे आहे, हे तर रिलेटिव्ह व्यु पॉइंटने ढेकूण आहे आणि रियल व्यु पॉइंटने शुद्धात्मा आहे. तुम्हाला शुद्धात्म्याला मारायचे आहे का? जमत नसेल तर बाहेर जाऊन टाकून या ना! म्हणजे मनुष्य सगळ्यांना मारून सुख शोधत असतो. मच्छरांना मारायचे, ढेकूण मारायचे, जे आले त्यांना मारायचे आणि सुख शोधायचे, हे दोन्ही एकाच वेळी होणे कसे शक्य आहे?
प्रश्नकर्ता : घरात खूप मुंग्या झाल्या तर काय करावे?
दादाश्री : ज्या खोलीत मुंग्या झाल्या असतील ती खोली बंद ठेवावी. यास उपद्रव म्हणतात. निसर्गाचा नियम असा आहे की काही दिवसांपर्यंत असा उपद्रव चालू राहतो. मग टाईम पूर्ण झाल्यावर उपद्रव बंद होऊन जातो, आपोआप, नैसर्गिकपणेच बंद होते! म्हणजे आपण ती खोली बंद ठेवावी. याचा जर तुम्ही शोध घेतला तर तुमच्याही लक्षात येईल. हा उपद्रव परमनन्ट आहे की टेम्पररी?
प्रश्नकर्ता : जास्त करून मुंग्या स्वयंपाक घरातच येत असतात. मग स्वयंपाक घर कसे बंद ठेवू शकतो?
दादाश्री : हे तर सर्व विकल्प आहेत. आपण हे समजून घ्यायला हवे. उपद्रव असेल तिथून बाजूला व्हावे. दोन स्वयंपाक घर ठेवा. एक स्टोव वेगळा ठेवा. त्या दिवशी काही तरी उकळून खाऊन घ्यावे. मारणे ही खूप भयंकर जोखीम आहे.
प्रश्नकर्ता : दररोजच्या व्यवहारात ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांनाच मारतो. दुसऱ्या कोणाला तर मारत नाही.