________________
अहिंसा
तुडवले तर त्याचे फळ येत नाही आणि काट्याला तुडवले तर फळ येते, तसेच मनुष्यातही आहे. म्हणून जपून चाला काटा टोचणे किंवा विंचवाचे चावणे दोन्हीही कर्मफळ आहेत. हे फळ आले, पण कोणाचे फळ ? माझे स्वतःचे. तर म्हणे, 'त्यांचे काय घेणेदेणे?' ते तर बिचारे निमित्त आहेत. जेवू घालणारे कोण असतात आणि वाढणारे कोण असतात?
म्हणून सावध व्हा. हे जग खूप वेगळ्या प्रकारचे आहे. अगदीच न्याय स्वरूप आहे. मी संपूर्ण जीवनाचा हिशोब (सार) काढला आहे, तो हिशोब काढता-काढता असा छान हिशोब काढला आहे आणि एक दिवस तो हिशोब मी जगाला देईन तेव्हाच जगाला शांती वाटेल. त्याशिवाय शांती वाटणार नाही. अनुभव तर घ्यावाच लागेल ना! अनुभवाच्या कक्षेपर्यंत आणले तरच काम होईल ना! की 'याचा काय परिणाम येईल' असे रिसर्च (संशोधन) तर करावे लागते ना!
जगण्याचा अधिकार तोडू शकतो का कोणाचा?
मी याचा सुद्धा तपास केला होता. काय पण या अक्कलवाल्यांनी अब्रू मिळवली! उंदीर हे मांजरीचे भोजन आहे. खाऊ द्या ना तिला! आणि जर चिचुंद्री जात असेल ना, तर मांजर तिला शिवत सुद्धा नाही. मांजर जर उपाशीच असेल तर उंदीर, जीवजंतुंना खाऊन टाकते मग त्या चिचुंद्रीला का खात नाही? पण ती चिचुंद्रीला शिवतही नाही. यावर तुम्ही विचार करा.
हे तर काही पुण्य केले होते म्हणून बसल्या-बसल्या, आरामशीर खायला मिळते. आणि या मजूरांना तर कष्ट केल्यानंतर पैसे मिळतील तेव्हा खायला मिळते. म्हणून आपण आता आपल्याकडून कोणाला दु:ख होणार नाही, प्राण्यांना, छोट्या जीवजंतूनाही दुःख होणार नाही अशा प्रकारे वर्तन ठेवावे. तसे तर लोक देवाचे नाव घेत राहतात आणि ज्यात देव बसले आहेत त्यांना मारत राहतात. साप निघाले तर त्यांना मारून टाकतात, ढेकणालाही मारून टाकतात. असे शूरवीर (!) लोक! लोक