________________
१२
अहिंसा
चंदुभाऊला सुद्धा माहीत नाही की हा डास माझ्याकडे येत आहे. ही 'व्यवस्थित शक्ती' संयोग, काळ वगैरे सर्व असे जुळवून आणते की दोघांना एकत्र करून एकमेकांचे भाव चुकते करवून मोकळे होतात. इतके सारे 'व्यवस्थित' आहे! म्हणजे डासाला हवेत ओढत-ओढत इथे आणतो आणि डंख मारुन तो डास पुन्हा हवेत ओढला जातो. नंतर तो कितीतरी मैल दूर निघून गेलेला असतो! मग तिथे जो वाकडा असेल त्याला फळ देतो.
काही फरक नाही, काटा आणि मच्छरमध्ये हा डास चावतो तेव्हा लोकांना डासाचा दोष दिसतो आणि जेव्हा काटा टोचतो तेव्हा काय करता? एवढा मोठा काटा पायात रुततो तेव्हा? काटा आणि मच्छर यात अजिबात फरक नाही, भगवंताने यात फरक मानलेला नाही. जो चावतो ना, तो आत्मा नाही. ते सर्व काटेच आहेत. पण त्या काट्याचा दोष दिसत नाही ना! त्याचे काय कारण?
प्रश्नकर्ता : तेथे कोणी जिवंत निमित्त दिसत नाही!
दादाश्री : आणि तो डास तर जिवंत दिसतो ना, म्हणून त्याला वाटते की हाच मला चावला. 'स्वतःला' भ्रांति असल्यामुळे त्याला जग सुद्धा भ्रांतिमयच दिसते. आत्मा कोणाला चावतच नाही. हे सर्व अनात्मा होऊन जगाला शिक्षा देत आहेत. परमात्मा शिक्षा देत नाहीत, आत्माही शिक्षा देत नाही, हे तर बाभळीचे काटेच सर्वांना टोचत राहतात.
डोंगरावरून भला मोठा दगड डोक्यावर पडला तर आधी वर मान करून बघतो की कोणी वरून घरंगळवला तर नाही ना? तिथे कोणी दिसले नाही की चूप! आणि जर एखाद्याने छोटासा खडा मारला असेल तर त्याच्याशी हळदीघाटाचे युद्ध सुरु करतो. याचे कारण काय? तर भ्रांतदृष्टी.
हे 'अक्रम विज्ञान' काय सांगते? की तो काटाही निमित्त आहे आणि हा भाऊ सुद्धा निमित्त आहे. दोष तर तुमचाच आहे. या फुलाला