________________
अहिंसा
करु नये कुठेही, हिटलरीजम या जगात कोणीही तुमच्यात ढवळाढवळ करु शकेल अशा परिस्थितीतच नाही. म्हणून जगाचा दोष काढू नका, तुमचाच दोष आहे. तुम्ही जेवढी ढवळाढवळ केली आहे त्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही ढवळाढवळ केली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही.
म्हणजे एक डास सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, जर तुम्ही ढवळाढवळ केली नाही तर. समजा खूप ढेकूण असलेल्या अंथरुणात तुम्हाला झोपवले पण तुम्ही दखल केलेली नसेल तर एक सुद्धा ढेकूण तुम्हाला स्पर्श करणार नाही. त्यामागे काय नियम असेल? ढेकणांसाठी लोक विचार करतात ना, की 'अरे, त्यांना उचलून फेका, असे करा, तसे करा' अशी दखल करतात ना सगळेजण? आणि औषध फवारतात का? हिटलरीजम सारखे करतात? असे करतात ना? तरीही ढेकूण काय म्हणतात, 'आमचा वंश नाश पावणार नाही. आमचा वंश तर वाढतच जाणार.'
अर्थात जर तुमची ढवळाढवळ बंद झाली तर सारे काही स्वच्छ होऊन जाईल. तुमची दखल नसेल तर या जगात तुम्हाला कोणीही चावू शकत नाही. नाही तर ही ढवळाढवळ कुणालाही सोडत नाही.
नेहमी, हिशोब चुकता झाला असे केव्हा म्हटले जाईल? तर मच्छरांच्या मधोमध बसला असाल तरीही मच्छर स्पर्श करत नाहीत, तेव्हा खऱ्या अर्थाने हिशोब चुकता झाला असे म्हटले जाईल. मच्छर स्वत:चा स्वभाव विसरतो. ढेकूण स्वतःचा स्वभाव विसरतो. इथे जर कोणी मारण्यासाठी आला असेल ना, तरी मला पाहताच तो मारण्याचे विसरून जातो. त्याचे सर्व विचारच बदलून जातात, त्याच्यावर परिणाम होतो, अहिंसेचा इतका सारा इफेक्ट होतो.
डासाला माहीत नाही की, मी चंदुभाऊकडे जात आहे आणि या