________________
अहिंसा
नाही ते नियमाबाहेरचे प्रश्नकर्ता : आणि हे डास सुद्धा खूप त्रास देतात?
दादाश्री :असे आहे, या जगात जर कोणतीही वस्तू त्रास देत असेल ना, ती नियमाबाहेर त्रास देऊच शकत नाही. म्हणजे ते नियमाबाहेर नाही. तुम्हाला नियमानुसारच त्रास होत आहे. आता तुम्हाला त्यापासून बचाव करायचा असेल तर मच्छरदाणी बांधा. किंवा असे अन्य काही उपाय करा पण त्यांना मारणे हा गुन्हा आहे.
प्रश्नकर्ता : बचाव करावा, पण मारू नये. दादाश्री : हो बचाव करावा.
प्रश्नकर्ता : पण डासाला मारले आणि 'श्रीराम' म्हटले तर तो उच्च गतीत जातो का?
दादाश्री : पण तो आपली अधोगती करेल. कारण त्याला त्रास होत असतो.
प्रश्नकर्ता : संतांना मच्छर चावतात की नाही?
दादाश्री : भगवंताला सुद्धा चावले होते ना! महावीर भगवंताना तर खूप चावले होते. हिशोब चुकता केल्याशिवाय सोडतच नाहीत ना!
सर्व आपलेच हिशोब म्हणजे एखाद्या डासाचा स्पर्श होणे ही काही थाप नाही. तर मग दुसरी कुठली गोष्ट थाप म्हणाची?! अरे, इथे पायाला चावायचे असेल तरी चावू शकत नाही, इथे हातावरच चावेल तेव्हाच जमेल. नेमके त्याच जागेवर! इतके आयोजनपूर्वकचे हे जग आहे. हे जग म्हणजे नुसती थाप
आहे का? एकदम 'रेग्युलेटर ऑफ द वर्ल्ड' आहे आणि वर्ल्डला सदैव 'रेग्युलेशन' मध्येच ठेवते, आणि हे सर्व मी स्वतः पाहून सांगत आहे.