________________
अहिंसा
दादाश्री : आम्ही तर आधीच पेमेन्ट चुकते करुन टाकले होते, म्हणून सध्या जास्त भेटत नाहीत. परंतु आत्ता सुद्धा जर कधी ढेकूण आमच्या जवळ आले तर ते आम्हाला ओळखून घेतात की हे काही मारणार नाहीत, त्रास देणार नाहीत. आम्हाला ओळखतात. अंधारातही ते आमच्या हातात येतात. पण ते जाणतात की हे आम्हाला सोडून देतील. आम्हाला ओळखतात. इतर सर्व जीवांनाही ते ओळखतात की हे निर्दयी आहेत, हे असे आहेत. कारण त्यांच्यातही आत्मा आहे. मग का नाही ओळखणार?!
आणि हा हिशोब चूकता केल्याशिवाय सुटकाच नाही. ज्यांचे-ज्यांचे रक्त प्यायला असाल त्यांना रक्त पाजावे लागेल. म्हणजे ती ब्लड बँक असते ना? तशी ही ढेकूण बँक म्हटली जाते. कोणी दोन घेऊन आला असेल तर दोन घेऊन जातो. यास बँक म्हटले जाते, बँकेत सर्व जमा होत असते.
ते रक्त पितात की देहभाव सोडवतात? म्हणजे जर ढेकूण चावत असेल तर त्याला उपाशी जाऊ देऊ नये. आपल्यासारख्या इतक्या श्रीमंत माणसाकडून तो गरीब ढेकूण बिचारा उपाशी जाईल हे कसे परवडेल?
__ आणि मला असे म्हणायचे आहे की, ते जर आपल्याला सहन होत नसेल तर त्यांना बाहेर नेऊन सोडावे. खरं तर आपली क्षमता असायला हवी. त्यांना जेवू घालण्याची शक्ती असायला हवी आणि ती शक्ती नसेल तर आपण त्यांना बाहेर नेऊन सोडावे. की भाऊ, तुम्ही दुसऱ्या जागी जेवायला जा. आणि जेवू घालण्याची शक्ती असेल तर त्याला जेवण करवूनच पाठवावे. तो जर जेवून गेला तर तुमचा खूप मोठा फायदा करून देईल. आत्मा मुक्त करून देईल. देहात थोडा भाव राहिला असेल तो देहभाव सुटेल. आणि हे ढेकूण काय म्हणतात? 'तुम्ही का म्हणून झोपता? तुमचे (आत्म्याचे) काही काम करून घ्या ना!' म्हणजे ते तर पहारेकरी आहेत.