________________
अहिंसा
दादाश्री : आजच नाही, हे पूर्वीपासूनच उलटे आहे, आत्ताच्या काळामुळे काही बदल झालेला नाही. पूर्वीपासूनच असे उलटे होते. जग हे असेच आहे! यामधून ज्याला महावीरांचा शिष्य व्हायचे असेल तो होऊ शकतो, नाही तरी शेवटी लोकांचे शिष्य तर व्हावेच लागणार. ते गुरु, ते बॉस आणि आपण त्यांचे शिष्य. मग मार खातच राहा ना! त्यापेक्षा तर महावीर भगवंत आपले बॉस झालेले चांगले. कारण ते वीतराग तर आहेत. भांडण वगैरे तर करत नाहीत.
स्वच्छता ठेवा, औषध मारू नका कित्येक जण ढेकणांना मारत नाहीत, पण गोधड्या वगैरे उन्हात वाळत टाकतात. आमच्या घरात तर याची सुद्धा मी मनाई केली होती. मी म्हणालो, 'कशाला त्या बिचाऱ्या ढेकणांना उन्हात त्रास देता?' तेव्हा ते म्हणतात, 'मग त्यांचा अंत केव्हा येईल?' मी सांगितले, 'ढेकणांना मारल्याने त्यांच्या संख्येत घट होत नाही. हा एक गैरसमज आहे की ढेकूण मारल्याने ढेकूण कमी होतात. मारल्याने कमी होत नाहीत. कमी झाले असे वाटते, पण दुसऱ्या दिवशी परत तेवढेच्या तेवढेच असतात.'
म्हणून आपण नीट साफसफाई केली पाहिजे. स्वच्छता असल्यावर तिथे ढेकूण उत्पन्न होत नाहीत. पण त्यांच्यावर औषध फवारले तर तो गुन्हाच म्हटला जाईल ना! आणि औषधाने ते काही मरत नाहीत. एकदा मरून गेले असे वाटते, पण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती होतेच. ढेकणांचाही एक नियम असतो. मी हे शोधून काढले होते की, काही काळात एकही ढेकूण दिसत नाही. कारण ते ठराविक काळानुसारच असतात आणि जेव्हा त्यांचा सिझन येतो आणि ते पुष्कळ प्रमाणात वाढतात, तेव्हा तुम्ही कितीही औषध फवारले तरी देखील ते वाढतच जातात.
___ संपवा पेमेन्ट पटापट प्रश्नकर्ता : ढेकूण त्याचा हिशोब असेल तेवढेच घेतो ना?