________________
अहिंसा
दादाश्री : ज्याला जीवजंतु मारायचे आहेत त्याला तसेच योग जुळून येतात आणि ज्याला मारायचे नाही त्याला त्याप्रमाणे योग जुळून येतात.
___ काही दिवसांसाठी 'मारायचे नाही' असा प्रयत्न कराल तर योग बदलतील. जगाचे नियम जर समजू शकाल तर तोडगा निघेल. अन्यथा मारण्याची परंपरा सुटत नाही आणि संसाराची परंपराही तुटत नाही. नजरचुकीने मारले गेले तर त्याबद्दल माफी मागून प्रतिक्रमण करून घ्यावे.
प्रश्नकर्ता : आम्ही सुद्धा दैनंदिन जीवनात विविध प्रकारची औषधे टाकून जीवजंतुंना मारत असतो, तर त्याचा इफेक्ट (परिणाम) आपल्यावर होतो का?
दादाश्री : तुम्ही जेव्हा मारता त्याचवेळी आतील परमाणू बदलतात आणि तुमच्या आत सुद्धा (जीव) मरतात. जितके तुम्ही बाहेर माराल तितके आत मरतील. जेवढे जग बाहेर आहे तेवढे जग आतही आहे. तुम्हाला जितके मारायचे असेल तितके मारा, तुमच्या आत सुद्धा मरत राहतील. जेवढे या ब्रह्मांडात आहे तेवढे या पिंडात आहे.
इतके सारे चोर असतात की, आपण त्यातून वाचू शकतच नाही. आपण कधी कोणाचा खिसा कापण्याचा, चोरी करण्याचा विचार करत नाही म्हणून ते तुमचा खिसा कापत नाहीत. अर्थात तुम्ही हिंसक न राहता अहिंसक राहाल, तर तुम्हालाही हिंसेचे योग जुळून येणार नाहीत, असे हे जग आहे. जगास जर एकदा समजून घेतले तर उलगडा होईल.
सहमत होतात त्याचा गुन्हा प्रश्नकर्ता : पावसाळ्यात गावांमध्ये माश्या व मच्छर अधिक प्रमाणात असतात, तेव्हा म्युनिसिपालिटीवाले किंवा आपल्या घरचे सर्व 'फ्लीट' (फवारा) मारतात, तर ते सुद्धा पापच म्हटले जाईल ना? आणि जर तसे नाही केले तर भयंकर रोगराई पसरते.