________________
अहिंसा
खूप दुःखं होईल, तुम्हाला त्याचा दोष लागेल त्यामुळे तुमच्यावर (ज्ञानावर) आवरण येईल आणि तुम्हाला भयंकर अधोगतीत जावे लागेल.' अशा प्रकारे समजावल्याने ते अहिंसेकडे वळतील. जीव हिंसेमुळे बुद्धी सुद्धा बिघडते. तुम्ही असे समजावता का कोणाला?
प्रश्नकर्ता : अहिंसा पाळण्याची आपली भावना ठाम असेल, परंतु काही व्यक्ती त्यात अजिबात मानत नसतील तर काय करावे?
दादाश्री : आपली ठामपणे अहिंसा पाळण्याची भावना असेल तर आपण नक्कीच अहिंसा पाळावी. तरी पण काही व्यक्ती अहिंसेत मानत नसतील तर त्यांना हळूवारपणे समजवावे. तेही हळूहळू त्यांची समजूत घालावी, म्हणजे मग तेही मानू लागतील. आपला प्रयत्न असेल तर कधी ना कधी हे शक्य होईल.
प्रश्नकर्ता : हिंसा थांबविण्याच्या प्रयत्नात निमित्त बनण्यासाठी आपण या पूर्वी समजावले होते. जे अहिंसा पाळण्यात मानत नसतील त्यांना प्रेमाने समजावून सांगावे. परंतु प्रेमाने समजावल्या नंतरही ते ऐकत नसतील तर काय करावे? हिंसा चालू द्यायची की शक्ती वापरुन त्यास थांबविण्याचा प्रयत्न करणे योग्य मानले जाईल?
दादाश्री : तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्यांची अशा प्रकारे भक्ती करावी, की 'हे देवा, प्रत्येकाला हिंसा रहित बनवा.' अशी तुम्ही भावना करा.
ढेकूण, एक समस्या (?) प्रश्नकर्ता : घरात खूप ढेकूण झाले असतील तर काय करावे?
दादाश्री : एकदा आमच्या घरात सुद्धा खूप ढेकूण झाले होते! बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तर ते ढेकूण इथे गळ्याला चावायचे, तेव्हा मी त्यांना उचलून माझ्या पायावर ठेवायचो. कारण गळ्यावर