________________
अहिंसा
प्रश्नकर्ता : आपल्याशी जुळलेल्या, आजुबाजूच्या कुठल्याही जीवाला दुःख होणार नाही असे जीवन जगणे शक्य आहे का? आपल्या आजुबाजू असलेल्या प्रत्येक जीवाला प्रत्येक परिस्थितीत आपण संतोष देऊ शकतो का?
___ दादाश्री : ज्याची असे (संतोष) देण्याची इच्छा असेल तो नक्कीच करू शकतो. जरी एका जन्मात सिद्ध नाही झाले तरी दोन-तीन जन्मात ते सिद्ध होईलच! तुमचे ध्येय मात्र निश्चित असायला पाहिजे, लक्ष्य असले पाहिजे, मग ध्येयसिद्ध झाल्याशिवाय राहणारच नाही.
टळते हिंसा, अहिंसेने... प्रश्नकर्ता : हिंसा टाळण्यासाठी काय करावे?
दादाश्री : निरंतर अहिंसकभाव उत्पन्न केला पाहिजे. मला लोक विचारतात की, 'हिंसा आणि अहिंसा कुठपर्यंत पाळावी?' मी सांगितले, हिंसा आणि अहिंसेची भेदरेषा महावीर भगवंत आखूनच गेले आहेत.' त्यांना माहीत होते की पुढे दुषमकाळ येणार आहे. भगवंतांना काय हे माहीत नव्हते की हिंसा कोणाला म्हणतात आणि कोणाला नाही? महावीर भगवंत काय सांगतात की हिंसेच्या समोर अहिंसा ठेवा. समोरच्या मनुष्याने हिंसेचे हत्यार वापरले तर आपण अहिंसेचे हत्यार वापरावे, तरच सुख उत्पन्न होईल. नाही तर हिंसेने हिंसा कधीच बंद होणार नाही, अहिंसेनेच हिंसा बंद होईल.
समज, अहिंसेची प्रश्नकर्ता : अधिकतर लोक हिंसेच्या मार्गानेच जात आहेत, त्यांना अहिंसेच्या मार्गावर वळवण्यासाठी काय करावे?
दादाश्री : आपण त्यांना समजावले पाहिजे. समजावले तर ते अहिंसेच्या दिशेकडे वळतील. त्यांना सांगावे की, 'भाऊ प्रत्येक जीवमात्रात भगवंत विराजमान आहेत. तेव्हा तुम्ही जर त्या जीवांना माराल तर त्यांना