________________
अहिंसा
चावलेलेच मात्र सहन होत नव्हते. म्हणून गळ्याला चावले की त्यांना पायावर ठेवायचो. कारण आपल्या हॉटेलात कोणी आले आणि ते उपाशी राहिले तर ते चुकीचे म्हटले जाईल ना?! तो आपल्याकडे येऊन जेवून गेला तर चांगलेच आहे ना! पण तुमच्यात एवढी शक्ती येणार नाही. म्हणून मी तुम्हाला तसे करण्यास सांगत नाही. तुम्ही तर त्या ढेकणाला उचलून बाहेर ठेवून या. म्हणजे तुम्हाला समाधान वाटेल की हा ढेकूण बाहेर गेला.
आता नियम असा आहे की, तुम्ही जरी लाख ढेकूण बाहेर नेऊन सोडले तरी पण आज रात्री तुम्हाला सात ढेकूण चावणार असतील तर ते सात चावल्याशिवाय राहणारच नाहीत. तुम्ही मारून टाकले तरीही सात चावतील, घराच्या बाहेर फेकून आलात तरीही सात चावतील, दूर फेकून आलात तरीही सात चावतील आणि त्यांना काही केले नाही तरी सुद्धा सात चावतील.
ढेकूण काय म्हणतात? तू जर खानदानी असशील तर तू आम्हाला आमचा आहार घेऊ दे आणि तू जर खानदानी नसशील तरी पण आम्ही जेवूनच जाणार आहोत, पण जेव्हा तू झोपशील तेव्हा. त्यापेक्षा तू आधीच खानदानीपणा दाखव ना!' म्हणून मी तर माझा खानदानीपणा दाखवला होता. पूर्ण शरीराला चावत असतील तरी चावू द्यायचो. ते ढेकूण माझ्या हाताने पकडलेही जायचे. पण मी त्यांना उचलून पुन्हा पायावर ठेवायचो. नाहीतरी आपण झोपल्यावर ते पोटभर जेवण जेवूनच जातात ना! आणि ते ढेकूण सोबत काही भांडे वगैरे तर घेऊन येत नाहीत. स्वत:पुरते खाऊन निघून जातात. आणि पुन्हा असेही नाही की दहा-पंधरा दिवसांचे एकदम खाऊन घ्यायचे! तर मग त्याला उपाशी कसे जाऊ द्यायचे? हो, इतके सगळे जेवून जायचे, निवांतपणे! मग रात्री आम्हाला आनंद वाटायचा की इतके सगळे जेवून गेले, दोन माणसांना जेवू घालण्याची शक्ती नाही आणि हे तर इतक्या सगळ्यांना जेवू घातले!