________________
११२
अहिंसा
प्रश्नकर्ता : पुद्गलकडून तो कसा काय अडवला जातो ?
दादाश्री : हे पुद्गल आहे ना, ते आत मिश्रचेतन आहे. जर जड असते ना, तर प्रकाश अडवला गेला नसता. पण हे मिश्रचेतन आहे म्हणून तो अडवला जातो.
प्रश्नकर्ता : आपण या खाडीचे आणि प्रकाशाचे जे उदाहरण दिले ते अगदी अचूक आहे.
दादाश्री : हो, पण हे उदाहरण आम्ही एखादे दिवशीच देतो नाही तर देऊ शकत नाही. हे उदाहरण सगळ्यांना देता येत नाही. नाही तर लोक उलट मार्गी लागतील.
नाही स्पर्शत हिंसा, आत्मस्वरूपीला
आता या रोडवर चंद्राचा उजेड असेल आणि गाडीला जर पुढची लाईट नसेल, तर लोक गाडी चालवतात की नाही ?
प्रश्नकर्ता : चालवतात.
दादाश्री : तेव्हा त्यांना कुठलीही शंका वाटत नाही. पण जर पुढची लाईट असेल तर शंका येते. बाहेर पुढची लाईट असेल तर त्या प्रकाशात त्याला दिसते की ओहोहो, इतके सारे जीवजंतु फिरत आहेत आणि ते सर्व गाडीवर आपटून मरत आहेत. पण मग तिथे त्याला शंका वाटते की मी जीवहिंसा केली.
हो, लोकांना तर लाईट नाममात्रही नाही, म्हणून त्यांना जीवजंतु दिसतच नाहीत. त्यामुळे त्यांना या बाबतीत शंका होतच नाही. आपल्याकडून जीव मारले जात आहेत असे समजतच नाही ना! पण ज्याचा जितका प्रकाश वाढतो तितके जीव दिसू लागतात. जसजसा लाईट वाढत जातो तसतसे लाईटच्या उजेडात जीवजंतु दिसण्याचे प्रमाण वाढते की, जीवजंतु गाडीवर आपटून मरत आहेत. त्याच प्रमाणे जशी जागृती