________________
अहिंसा
वाढत जाते तसतसे स्वतःचे दोष दिसू लागतात. नाही तर लोकांना स्वत:चे दोष दिसतच नाहीत ना? आत्मा हा लाईट स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, त्या आत्म्याला स्पर्शेन कोणत्याही जीवाला काहीच दुःख होत नाही. कारण जीवांच्याही आरपार निघून जाईल असा आत्मा आहे. जीव स्थूल आहेत आणि आत्मा सूक्ष्मतम आहे. हा 'आत्मा' अहिंसकच आहे. जर त्या आत्म्यात राहिलात तर 'तुम्ही' अहिंसकच आहात. आणि जर देहाचे मालक व्हाल तर हिंसक आहात. तो आत्मा जाणण्यासारखा आहे. असा आत्मा जाणल्यानंतर मग त्याला दोष कसा लागेल? हिंसा कशी स्पर्शेल? म्हणून आत्मस्वरूप झाल्यानंतर कर्म बांधले जातच नाहीत.
प्रश्नकर्ता : मग जरी जीवहिंसा केली तरीही कर्म बांधले जात नाहीत?
दादाश्री : हिंसा होतच नाही ना! 'आत्मस्वरुपाने' हिंसाच होत नाही. जो 'आत्मस्वरूप' झाला, त्याच्याकडून हिंसा होणारच नाही.
म्हणून आत्मज्ञान झाल्यानंतर कोणतेच नियम स्पर्शत नाही. जोपर्यंत देहाध्यास आहे तोपर्यंत सर्व नियम आहेत, आणि तोपर्यंतच सर्व कर्म बांधली जातात. आत्मज्ञान झाल्यानंतर कोणत्याही शास्त्राचा नियम स्पर्शत नाही, कर्म स्पर्शत नाही, हिंसा वगैरे काहीच स्पर्शत नाही.
प्रश्नकर्ता : अहिंसा धर्म कसा आहे ? स्वयंभू?
दादाश्री : स्वयंभू नाही. पण अहिंसा आत्म्याचा स्वभाव आहे आणि हिंसा हा आत्म्याचा विभाव आहे. पण हा खरोखर स्वभाव नाही. आत कायमसाठी राहणारा स्वभाव नाही हा. कारण असे जर मोजायला गेलो तर असे खूप सारे स्वभाव असतात. म्हणजे हे सर्व द्वंद्व आहेत.
__म्हणजे गोष्ट समजण्याचीच गरज आहे. हे 'अक्रमविज्ञान' आहे. हे वीतरागांचे, चोवीस तीर्थंकरांचे विज्ञान आहे ! पण तुम्ही हे कधी ऐकले नाही, म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटते की, हे काय असे नवीनच प्रकारचे