________________
अहिंसा
१११
प्रश्नकर्ता : स्वसंवेदनशील आहे, त्याचे दर्शन समग्र असते ना?
दादाश्री : समग्र असते. पण अजून अशी दशा या काळात होईल असे नाही. म्हणून स्वसंवेदन ही तितके कच्चे राहते. या काळात संपूर्ण स्वसंवेदन होऊ शकत नाही. समग्र दशा तर जेव्हा केवळज्ञान होते तेव्हा होते.
'लाईट' ला चिखल रंगवू शकतो? तुम्हाला आत्म्याच्या प्रकाशाची माहीती नसेल का? या गाडयांच्या लाईटचा प्रकाश जर या बांद्राच्या खाडीत गेला, तर त्या प्रकाशाला तो वास स्पर्श करेल, की नाही करणार? किंवा त्या प्रकाशाला खाडीचा रंग लागेल की नाही?
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तेव्हा चिखलाने माखतो का? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : हा प्रकाश चिखलाला स्पर्श करतो, पण चिखल त्याला स्पर्श करत नाही. तर या गाडीचा प्रकाश असा आहे, मग आत्म्याचा प्रकाश कसा असेल! त्यावर कुठेही लेप चढतच नाही. म्हणून आत्मा निरंतर निर्लेपच असतो, असंगच राहतो. काही स्पर्शतच नाही, चिकटतच नाही असा आत्मा आहे.
म्हणजे आत्मा तर प्रकाश स्वरूप आहे पण तो असा प्रकाश नाही. तो प्रकाश मी पाहिला आहे, तो प्रकाश आहे. या गाडीच्या लाईटच्या प्रकाशाला तर भिंत अडवते. भिंत जर मधे आली तर प्रकाश अडवला जातो. 'तो' (आत्म्याच्या) प्रकाश भिंतीमुळे अडवला जाईल असा नाही. फक्त हे पुद्गलच असे आहे की त्याच्यामुळे तो अडवला जातो. भिंतीने तो अडवला जाऊ शकत नाही. मधे डोंगर असेल तरीही तो अडवला जाऊ शकत नाही.