________________
११०
अहिंसा
दादाश्री : स्वसंवेदन तर बोलू शकत नाही. ती तर खूप उच्च वस्तू आहे. स्वसंवेदन ही तर अंतिम गोष्ट आहे. आता तर आपण 'मी निर्वेद आहे' असे बोलावे की ज्यामुळे वेदना कमी होतील. माझे म्हणणे असे आहे की, तरीही वेदना एकदम जात नाही. आणि स्वसंवेदन म्हणजे तर 'ज्ञान'च झाले. त्यास फक्त 'जाणतो'च! जरी डंख लागला, जबरदस्त डंख लागला तरीही त्यास जाणतच राहतो, वेदतच नाही. याला स्वसंवेदन म्हटले जाते.
प्रश्नकर्ता : पण डास चावला आणि त्याची जी प्रतिक्रिया झाली की 'मला हा डास चावला.' त्या प्रतिक्रियेलाही स्वसंवेदनात जाणतो?
दादाश्री : हो, त्यासही जाणतो.
प्रश्नकर्ता : पण आपण सांगितले की, 'मी वेदत नाही. वेदत नाही' म्हणजे लोक असे समजतात की वेदनता निघून गेली.
दादाश्री : नाही, असे नाही. वेदनतेला सुद्धा तो जाणतो. परंतु माणसाची एवढी क्षमता नाही. म्हणून 'मी निर्वेद आहे' असे बोल ना, मग त्याचा परिणाम होणार नाही. 'आत्म्याचा' स्वभाव निर्वेद आहे. हे बोलल्याने त्याच्यावर' काही परिणाम होत नाही. परंतु स्वसंवेदन ही खूप उच्च वस्तू आहे. तो जर जाणत राहिला तर स्वसंवेदनमध्ये जातो. त्यात तर त्याने फक्त जाणावे. की हा डंख लागला. त्यास जाणले. नंतर हा डंख उडून गेला त्यासही जाणले. असे करत-करत स्वसंवेदनात जातो. पण निर्वेद ही तर एक स्टेप आहे की बेचैन झाल्याशिवाय तो सहन करू शकतो.
प्रश्नकर्ता : आत्माच स्वतःस्वसंवेदनने जाणला जातो ना?
दादाश्री : आत्मा स्वतः स्वसंवेदनच आहे. पण तुम्ही 'हे' ज्ञान घेतले आहे तरी पण तुमचा मागील अहंकार आणि ममता अजून जात नाही ना!