________________
अहिंसा
नाही, मी तर निर्वेद आहे. म्हणजे थोडया अंशाने तरी तू पुन्हा तुझ्या होम डिपार्टमेंटकडे आलास. असे करत करत शंभर-दोनशे वेळा तुला डास चावतील, मग असे करत करत तू स्वतः निर्वेद होऊन जाशील.' निर्वेद म्हणजे काय? फक्त जाणणारा, की 'डास' या इथे चावला. ' स्वतः वेदले नाही, ते निर्वेद! खरोखर स्वतः वेदतच नाही पण वेदतो हा पूर्वीचा अभ्यास आहे. पूर्वीचा अभ्यास आहे म्हणून तो बोलतो की ‘हा मला चावला.' खरोखर स्वतः निर्वेदच आहे. पण तुम्ही ह्या सत्संगात बसूनबसून हे पद समजून घ्यावे, हे संपूर्ण पद समजून घ्यावे की आत्मा खरोखर असा आहे. तेव्हा आता तर आपण शुद्धात्मा पदाने चालवून घ्यायचे. इतके बोलला तरी त्याचे कर्म बांधण्याचे थांबले. त्या आरोपित भावापासून सूटला म्हणून कर्म बांधण्याचे थांबले.
१०९
प्रश्नकर्ता : डास चावला असेल तरीही 'मी वेदक नाही' असे म्हणायचे ?
दादाश्री : हो, तुम्ही असे बसले असाल आणि इथे हातावर डास बसला. म्हणजे ‘बसला' असा आधी तुम्हाला अनुभव होतो. ते तुम्ही जाणता. डास बसला त्यावेळी तुम्हाला जाणपणा असतो की वेदकपणा असतो ? तुम्हाला काय वाटते ?
प्रश्नकर्ता : डास बसतो त्यावेळी तर जाणपणाचा असतो.
दादाश्री : हो, नंतर तो डंख करतो त्यावेळी सुद्धा जाणपणाचाच असतो. पण मग ‘मला डास चावला, मला चावला' असे म्हणतो, म्हणून तो वेदक होतो. आता खरोखर तर तो निर्वेद आहे, म्हणून डास डंख मारतो त्यावेळी आपण म्हणावे की, 'मी तर निर्वेद आहे. ' नंतर डंख आत खोलवर जातो तेव्हा आपण पुन्हा म्हणावे की, 'मी निर्वेद आहे. '
प्रश्नकर्ता : आता आपण निर्वेदची गोष्ट केली. पण दुसरा एक शब्द वापरला आहे की स्वसंवेदन असते.