________________
१०८
अहिंसा
अर्थाने) शुद्धात्मा समजल्यावर कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा काही पण अशुभ केले, ते स्वतःच्या गुणधर्मात येतच नाही. त्याला शुद्धात्म्याचे लक्ष पूर्णपणे आहे. पण अजून जोपर्यंत स्वतःला शंका वाटते की मला दोष लागला असेल! माझ्याकडून जीव मारला गेला आणि मला त्याचा दोष लागला, अशी शंका वाटते तोपर्यंत सकाळच्या प्रहरी स्वतः निश्चय करून निघावे, 'माझ्या मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो' असे पाच वेळा बोलून निघा, असे 'आपण' 'चंदुभाऊ' कडून बोलवून घ्यावे. म्हणजे आपण जरा असे म्हणावे की चंदुभाऊ, बोला, सकाळी उठल्याबरोबरच बोला, 'मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो, ही आमची दृढ प्रतिज्ञा आहे.' आणि असे 'दादा भगवानांच्या साक्षीने बोलून निघालात की मग सर्व जबाबदारी दादा भगवानांची.'
आणि जर शंका वाटत नसेल तर त्याला काही हरकत नाही. आम्हाला शंका वाटत नाही आणि तुम्हाला शंका वाटते ते साहजिक आहे. कारण तुम्हाला हे ज्ञान दिले गेले आहे. एका माणसाने स्वतः कमावून लक्ष्मी जमा केली असेल आणि एका माणसाला लक्ष्मी (दुसऱ्यांकडून) दिली गेली असेल, तर त्या दोघांच्या व्यवहारात खूप फरक असतो.
खरोखर तर ज्ञानी पुरुषांनी जो आत्मा जाणला आहे ना, तो आत्मा तर कोणालाही किंचितमात्र दुःख देत नाही, असा आहे, आणि कोणी त्याला किंचितमात्र दुःख देऊ शकत नाही, असा आहे. खरोखर तर मूळ आत्मा असा आहे.
वेदक-निर्वेदक-स्वसंवेदक एक माणूस मला विचारत होता. तो मला म्हणाला, 'डास चावतात ते कसे परवडेल?' तेव्हा मी सांगितले, 'ध्यानात बैस. डास चावला तर पाहत रहा.' तेव्हा तो म्हणाला, 'ते तर सहन होत नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'असे बोल की मी निर्वेद आहे. आता वेदक स्वभाव माझा