________________
अहिंसा
१०७
हिंसेशिवाय जग नाहीच, संपूर्ण जग हिंसामयच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच अहिंसक व्हाल तेव्हा जग सुद्धा अहिंसक होईल. आणि अहिंसेच्या साम्राज्याशिवाय कधीच केवळज्ञान होत नाही, जी जागृती आहे ती पूर्णपणे येणार नाही. हिंसा नावालाही नसावी. हिंसा कोणाची करता? हे सर्व परमात्माच आहेत, जीवमात्रात परमात्माच आहेत. कोणाची हिंसा कराल? कोणाला दुःख द्याल?
चरम अहिंसेचे विज्ञान जोपर्यंत तुम्हाला असे वाटते की 'मी फूल तोडत आहे, मला हिंसा लागत आहे.' तोपर्यंत तुम्हाला हिंसा लागेल. आणि जो हे जाणत नाही, त्यालाही हिंसा लागते. परंतु हे जाणल्यानंतर जे तोडतात तरी पण स्वतः स्वभावात आलेले आहेत, म्हणून त्यांना हिंसा लागत नाही.
कारण असे आहे ना की, भरत राजाला तेराशे राण्यांसोबत सुद्धा, युद्ध करत असताना सुद्धा ज्ञान हजर राहिले होते. तेव्हा ते अध्यात्म कसे असेल? आणि या लोकांना तर एकच राणी असेल तरीही राहत नाही. भरत राजाने ऋषभदेव भगवंताना सांगितले की, 'भगवंत, मी हे युद्ध करतो आणि कित्येक जीवांची हिंसा होत आहे, आणि ही तर मनुष्यांची हिंसा होतेय, इतर लहान जीवांची हिंसा झाली असती तर ठीक आहे पण ही तर मनुष्य हिंसा! आणि तेही युद्ध करतो म्हणूनच होते ना!' तेव्हा भगवंतांनी सांगितले की, 'हा सर्व तुझा हिशोब आहे आणि तो तुला चुकता करायचा आहे.' तेव्हा भरत राजा म्हणतात, 'पण मलाही मोक्षास जायचे आहे, मला काही इथे बसून राहायचे नाही.' तेव्हा भगवंत म्हणतात, 'आम्ही तुला अक्रम विज्ञान देत आहोत, ते तुला मोक्षास घेऊन जाईल. म्हणजे स्त्रियांसोबत राहून सुद्धा, युद्ध करुन सुद्धा काही पशणार नाही. निर्लेप राहू शकेल, असंग राहू शकेल, असे ज्ञान देत आहोत.'
शंका तोपर्यंत दोष 'या ज्ञानानंतर स्वतः शुद्धात्मा होऊन गेला. आता दरअसल (खऱ्या