________________
१०६
अहिंसा
दादाश्री : हो, त्यालाही हिंसा नडते. पण नऊ कलम बोलल्याने आत्तापर्यंत जी हिंसा झालेली असते ती धुतली जाते. पण ह्या पाच आज्ञा जो पाळतो ना, त्याला तर हिंसा र्पशतच नाही. हिंसेच्या समुद्रात फिरतो. संपूर्ण समुद्रच हिंसेचा आहे. हा हात वर केला तरी कितीतरी जीव मरतात. हे जग पूर्णपणे जीवांनीच भरलेले आहे. पण आमच्या पाच आज्ञा पाळतो त्याक्षणी तो ह्या देहात नसतो. आणि देह स्थूल असल्याने इतर जीवांना ते दुःखदायी बनते. आत्मा सूक्ष्म असल्याने कोणालाही नुकसान करीत नाही. म्हणून आम्ही आमच्या पुस्तकात स्पष्ट लिहिले आहे की, आम्ही हिंसेच्या समुद्रात संपूर्णपणे अहिंसक आहोत. समुद्र तर हिंसेचा आहे पण त्यात आम्ही संपूर्ण अहिंसक आहोत. आमचे मन तर हिंसक नाहीच. परंतु वाणी जरा कुठे तरी हिंसक आहे, पण ती टेपरेकॉर्ड आहे. आम्हाला तिचा मालकीपणा नाही. तरी पण टेपरेकॉर्ड आमचीच म्हणून तेवढ्यापुरता आमचा गुन्हा आहे. त्याचे प्रतिक्रमण आम्हाला करावे लागतात. पूर्वीची चूक तर आमचीच होती ना! हु इज द ओनर? तेव्हा आपण म्हणू की 'वी आर नॉट द ओनर.' तर म्हणे पूर्वीचे ओनर आहात. मधल्या काळात तुम्ही विकली नव्हती, मधल्या काळात विकली असती तर गोष्ट वेगळी होती.
प्रश्नकर्ता : दादा, तुमच्या अहिंसक वाणीने आम्ही सर्व महात्मा अहिंसक होत आहोत.
दादाश्री : आमच्या आज्ञेचे पालन केलेत तर तुम्ही अहिंसक आहात, असे इतके सुंदर सांगतोय, मग! आणि आज्ञा कठीण असेल तर मला सांगा, बदलून देऊ.
संपूर्ण अहिंसा तिथे प्रगटते केवळज्ञान म्हणजे उच्च प्रकारचा धर्म कोणता की, जिथे सूक्ष्म भेदाने अहिंसा समजली असेल. संपूर्ण अहिंसा म्हणजे केवळज्ञान! म्हणजे हिंसा बंद झाली तर, समजावे की इथे खरा धर्म आहे.