________________
अहिंसा
गाडलेला दिसतोय, त्यात माझा काय गुन्हा ? तेव्हा पोलिसवाला म्हणाला, ते आम्ही बघत नाही. आम्ही फक्त हेच बघतो की, हु इज द ओनर नाऊ? आज कोण मालक आहे ?' आज मालकीपणा नसेल तर जोखीमदार नाही. मालक आहे तर जोखीम आहे. '
"
१०४
म्हणजे ते लोक सुद्धा समजून गेले. जरी पंधरा दिवसांपूर्वी घेतली तरी जोखीमदार तर झालाच ना ? बाकी, असे बुद्धीने पाहायला गेलो तर तो माल तिथे पावसाळ्यापूर्वीच गाडलेला होता.
आता जर इतक्या बारकाईने समजेल तर उलगडा होईल. नाही तर उलगडा होईलच कसा? हे तर पझल (कोडे) आहे. द वर्ल्ड इज द पझल इटसेल्फ. हे पझल कसे सॉल्व करता येईल ? देर आर टु व्युह पॉइंटस टु सॉल्व धीस पझल. वन रिलेटिव्ह व्हयु पॉइंट, वन रियल व्हयु पॉइंट. या जगात जर पझल सॉल्व नाही केले तर तो या पझलमध्येच डिजॉल्व झालेला आहे. संपूर्ण जग, सर्वच या पझलमध्ये डिजॉल्व झालेले आहेत.
प्रश्नकर्ता : असा अर्थ काढून तर सगळे लोक मजाच करतील ना, की मी मालक नाही, असे ? आणि मग तर सगळेच अशा प्रकारे सांगून दुरुपयोग करतील ना ?
दादाश्री : मालक नाही असे कोणी सांगतच नाही. नाही तर आता एक चापट जरी मारली ना, तरीही मालक होऊन जाईल! शिव्या दिल्या तरीही मालक होऊन जाईल, लगेचच भांडायला उभा राहील. म्हणून आपण समजावे की, हा मालक आहे. मालक आहे की नाही याचा पुरावा लगेच मिळतो ना! त्याचे टाईटल दिसूनच येते की, हा मालक आहे की नाही ? शिव्या दिल्या तर लगेच टाईटल दाखवतो की नाही ? वेळच नाही लागत. बाकी, असे तोंडी बोलल्याने काहीही निष्पन्न होते का ?
प्रश्नकर्ता : पण या गाड्यांमधून फिरतात यात पाप नाही का ?