________________
अहिंसा
१०३
आहे म्हणून हिंसा होते. जेव्हा की हा पाय माझा नाही. या देहाचे आज तुम्हाला जे करायचे असेल ते करू शकता. या देहाचा मी मालक नाही.' नंतर म्हणाले, 'हा मालकीपणा आणि न-मालकीपणा कशास म्हणायचे ते आम्हाला सांगा.' तेव्हा मी म्हणालो, 'मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावतो.'
"एका गावात एक एरिया (परिसर) खूप चांगला आहे, आजुबाजूला दुकाने आणि मध्यभागी पाच हजार फुटाचा किमती एरिया. त्यासाठी कोणीतरी सरकारला तक्रार केली की, या जागेत एक्साइजचा माल गाडलेला आहे. म्हणून पोलिस खात्यावाले तिथे गेले. नुकताच पावसाळा संपला होता, म्हणून त्या जागेवर सुंदर हिरवळ आणि लहान रोपटी उगवलेली. ती जागा आधी खणून काढली. नंतर दोन-तीन फूट खोल खणले, त्यानंतर तिथून तो सर्व एक्साइजचा माल निघाला. तेव्हा फौजदारने आजुबाजूवाल्यांना विचारले की, 'या जागेचा मालक कोण आहे?' तेव्हा लोकांनी सांगितले, 'ही तर लक्ष्मीचंद शेठची जागा आहे.' नंतर फौजदाराने विचारले की, 'ते कुठे राहतात?' तेव्हा ते अमक्या ठिकाणी राहतात असे त्यांना समजले. म्हणून पोलिसवाल्यांना तिथे पाठवले की, लक्ष्मीचंद शेठला पकडून आणा. पोलिस लक्ष्मीचंद शेठकडे गेले. तेव्हा लक्ष्मीचंद शेठने सांगितले की, भाऊ, ही जागा माझी आहे असे जे तुम्ही सांगता ते खरे आहे. पण मी ती जागा पंधरा दिवसांपूर्वीच विकून टाकली आहे. आज मी त्या जमिनीचा मालक नाही. तेव्हा त्या पोलिसाने विचारले की कोणाला विकली ते सांगा. तुम्ही त्याचा पुरावा दाखवा. नंतर शेठने पुराव्याची झेरॉक्स प्रत दाखवली. ती प्रत पाहून पोलिस ज्याने जमीन विकत घेतली होती, त्याच्याकडे गेले. त्याला विचारले की, भाऊ ही जागा तुम्ही विकत घेतली आहे का? तेव्हा तो म्हणाला, 'हो, मी विकत घेतली आहे.' पोलिसवाल्याने सांगितले की, तुमच्या जमिनीतून असे निघाले आहे. तेव्हा तो म्हणाला, पण मी ही जमीन पंधरा दिवसांपूर्वीच घेतली आहे आणि हा माल तर पावसाळ्यापूर्वीच