________________
१०२
अहिंसा
प्रश्नकर्ता : मग ती हिंसा कशा प्रकारची असते?
दादाश्री : ती अंतिम प्रकारची. स्वतः जाणतो आणि त्याचा निकाल लावतो. झपाट्याने निकाल लावून मुक्त होतो.
ज्ञानी, हिंसेच्या समुद्रात संपूर्ण अहिंसक अरे, आम्हालाच लोक विचारतात की, आपण ज्ञानी असूनही मोटारीत फिरता, मग मोटारीखाली किती तरी जीवहिंसा होत असेल, याची जबाबदारी कोणाची? आता ज्ञानी पुरुष जर संपूर्ण अहिंसक नसतील तर त्यांना ज्ञानी म्हणायचेच कसे? संपूर्ण अहिंसक म्हणजे हिंसेच्या समुद्रात संपूर्ण अहिंसक! ते म्हणजे ज्ञानी!! त्यांना किंचितमात्र हिंसा लागत नाही.
नंतर ते लोक मला म्हणतात की, 'तुमचे पुस्तक आम्ही वाचले, खूप आनंद देणारे पुस्तक आहे आणि ते आम्हाला अविरोधाभासी वाटले. परंतु आपल्या वर्तनात विरोधाभास वाटतो.' मी म्हणालो, 'कोणत्या वर्तनात विरोधाभास वाटले?' तेव्हा म्हणाले, 'आपण गाडीत फिरता ते.' मी म्हणालो बघा, 'मी तुम्हाला समजावतो, भगवंताने शास्त्रात काय सांगितले आहे, ते आधी समजावतो. नंतर मग तुम्हीच न्याय करा.' तेव्हा ते म्हणाले, 'शास्त्रात काय म्हटले आहे?' मी म्हणालो, 'आत्मस्वरूप अशा ज्ञानी पुरुषांची जबाबदारी किती असते!? ज्ञानी पुरुषांना देहाचा मालकीपणा नसतो. देहाचा मालकीपणा त्यांनी फाडून टाकला आहे. म्हणजे या पुद्गलचा मालकीपणा त्यांनी फाडून टाकलेला आहे. अर्थात ते स्वतः देहाचे मालक नाहीत. आणि मालकीपणा नसल्यामुळे त्यांना दोष लागत नाही. दुसरे असे की, ज्ञानी पुरुषांना त्याग संभवत नाही.' तेव्हा म्हणाले, 'त्या मालकीपणाविषयी मला समजले नाही.' तेव्हा मी म्हणालो, 'तुम्हाला असे कशामुळे वाटते की, माझ्याकडून हिंसा होईल?' तेव्हा ते म्हणाले. 'माझ्या पायाखाली एखादा जीवजंतु आला तर माझ्याकडून हिंसा झाली असेच म्हटले जाईल ना?' म्हणून मी म्हणालो, 'हा पाय तुमचा