________________
अहिंसा
१०१
दादाश्री : हो. त्यास दया म्हणतात. दया हे धर्माचे मूळच आहे आणि दयेची पूर्णाहुती तिथे धर्माची पूर्णाहुती होत असते.
हिंसे-अहिंसेच्या पर प्रश्नकर्ता : दया असते तिथे निर्दयता असतेच. असे हिंसा आणि अहिंसेच्या बाबतीतही आहे का?
दादाश्री : आहे ना! अहिंसा आहे तर हिंसा आहे. हिंसा आहे म्हणून अहिंसाही उभी आहे. पण शेवटी करायचे काय? तर हिंसेतून बाहेर निघून अहिंसेत यायचे, आणि अहिंसेतून सुद्धा बाहेर निघायचे. या द्वंद्वाच्या पर जायचे आहे. अहिंसा, ही पण सोडायची आहे.
प्रश्नकर्ता : अहिंसेच्या पर, ही कोणती स्थिती आहे ?
दादाश्री : हीच, आता आम्ही हिंसे-अहिंसेच्या परच आहोत. अहिंसा अहंकाराच्या अधीन आहे. आणि अहंकाराच्या पर ती ही 'आमची' स्थिती! हिंसा-अहिंसा मी पाळतो, तर त्यास पाळणारा अहंकार असतो. म्हणून हिंसा आणि अहिंसेच्या पर, म्हणजे द्वंदाच्याही पर झाले तरच ते ज्ञानी म्हटले जातील. सर्व प्रकारच्या द्वंद्वाच्या पर. आपले साधु महाराज खूप दयाळू असतात. पण आत निर्दयता सुद्धा भरलेली असते. दया आहे म्हणून निर्दयता आहे. एका कोपऱ्यात जरी खूप दया आहे, ऐंशी टक्के दया आहे, तर वीस टक्के निर्दयता आहे. अठ्ठयाऐंशी टक्के दया आहे तर, बारा टक्के निर्दयता आहे. शहाण्णव टक्के दया आहे तर, चार टक्के निर्दयता आहे.
प्रश्नकर्ता : असे हिंसेतही असते. शहाण्णव टक्के अहिंसा असेल तर चार टक्के हिंसा असते, असे?
दादाश्री : एकूण बेरीजच दिसते ना! बेरीज स्वतःच बोलते ना! की अहिंसा शहाण्णव आहे मग बाकी काय राहिले? चार टक्के हिंसा राहीली.