________________
अहिंसा
दादाश्री : हो. आणि त्या तीर्थंकरांची तर गोष्टच कुठे ! कसे ते पुरुष ! आज जग जर तीर्थंकरांच्या एकाच वाक्याला जरी समजले असते ना, एकच वाक्य, तरी संपूर्ण जगाने त्यांची पूजा केली असती. पण ते वाक्य त्यांना समजतच नाही ना! आणि कोणी समजावणारा सुद्धा नाही.
प्रश्नकर्ता : आपण आहात ना ?
दादाश्री : माझ्या एकट्याची पिपाणी कशी वाजेल ?
ज्ञानीपुरुषांच्या अहिंसेचा प्रताप
ज्ञानी पुरुषांचा व्यवहार कसा असतो ? इतका अहिंसक असतो की, मोठमोठे वाघ पण लाजतील. मोठमोठे वाघ बसले असतील तरी ते गारठतील. त्यांना सर्दी होऊन जाईल, खरोखरची सर्दी होईल ना! कारण तो अहिंसेचा प्रताप आहे. आणि हिंसेचा प्रताप तर जगाने पाहिलाच आहे ना! हा हिटलर, चर्चिल या सगळ्यांचा प्रताप पाहिलाच ना ? शेवटी काय घडले? विनाशाला आमंत्रण दिले. हिंसा, हे विनाशी तत्त्व आहे आणि अहिंसा हे अविनाशी तत्त्व आहे.
अहिंसा, तिथे हिंसा नसते
प्रश्नकर्ता : अहिंसा असते तिथे हिंसा असते का ?
दादाश्री : जिथे संपूर्ण अहिंसा असते तिथे हिंसा नसते. ती मग आंशिक अहिंसा म्हटली जाते. पण जी संपूर्ण अहिंसा असेल, त्यात हिंसा नसतेच. पपईच्या जेवढया स्लाइसीस पाडल्या त्या सर्व पपईमयच असतात, त्यात एकही कडू निघणार नाही. म्हणजे स्लाइस एकाच प्रकारची असते, म्हणून अहिंसेत हिंसा नसते आणि संपूर्ण हिंसा असते तिथे अहिंसाही नसते. पण आंशिक हिंसा, आंशिक अहिंसा ही वेगळी वस्तू आहे.
प्रश्नकर्ता : आंशिक अहिंसा, त्यास दया म्हणतात ?
१००