________________
अहिंसा
जीव, अगदी लहानात लहान जीवासाठी पण मी मनाने शस्त्र उगारले नाही, कधीच नाही. मग दुसरे काही कसे उगारु शकतो? वाणी जराशी कडक निघते कधी तरी, वर्षभरात एखाद्या दिवशी. जसे खादी आणि रेशीममध्ये फरक असतो ना, खादी कशी असते? तशी थोडीशी कडक वाणी निघते कधी तरी. तेही वर्षभरात एखाद्या दिवशी. बाकी, वाणीनेही कधी दु:ख दिले नाही, आणि मनानेही कधीच शस्त्र उगारले नाही!
अगदी छोट्यात छोटा जीव असेल, पण त्यावर मी मनाने सुद्धा शस्त्र उगारले नाही. या जगातील कोणताही जीव, एखादा छोटा जीव असेल, हा विंचू जरी आता चावला असता तरी पण आम्ही त्याच्यावर शस्त्र उगारले नसते! तो तर त्याचे कर्तव्य बजावून जातो. त्याने जर त्याचे कर्तव्य बजावले नाही तर आपली सुटका होणार नाही. म्हणून कधीच कोणत्याही जीवासाठी मी मन बिघडवलेले नाही, याची खात्री! अर्थात मानसिक हिंसा कधीच केली नाही. नाही तर मनाचा स्वभावच आहे, काही तरी दिल्याशिवाय राहतच नाही.
प्रश्नकर्ता : तुम्ही समजूनच गेले असाल की या शस्त्राचे काही कामच नाही.
दादाश्री : हो, शस्त्र कामाचेच नाही. या शस्त्राची गरज आहे, असा कधी विचारच आला नाही. आम्ही जेव्हापासून तलवार जमिनीवर ठेवली तेव्हापासून कधी उचललीच नाही. समोरचा शस्त्रधारी असेल तरीही आम्ही कधी शस्त्र धारण केले नाही. आणि शेवटी हाच मार्ग धरावा लागेल. ज्याला या जगातून पळून जायचे असेल, ज्याला हे जग अनुकूल वाटत नाही, त्याला शेवटी हाच मार्ग धरावा लागेल, दुसरा मार्गच नाही.
म्हणून फक्त एक अहिंसा सिद्ध केली तरीही खूप झाले. संपूर्ण अहिंसा सिद्ध केली तर तिथे वाघ आणि बकरी सोबत पाणी पितील!
प्रश्नकर्ता : ते तर तीर्थंकरांमध्येच त्या प्रकाराचेच होते ना?