________________
अहिंसा
सर्वात मोठी जोखीम आहे. परपुरुष आणि परस्त्री हे नरकात घेऊन जाणारे आहेत. आणि स्वतःच्या घरीही नियम तर असलाच पाहिजे ना? हे तर असे आहे ना, स्वतःच्या हक्काच्या स्त्रीशी विषय हे अयोग्य नाही. पण तरी त्याचबरोबर इतके समजावे लागेल की त्यात खूप सारे जर्स (जीव) मरतात. म्हणून विनाकारण तर असे नसावेच ना? कारण असेल तर गोष्ट वेगळी आहे. वीर्यात 'जर्सच' असतात आणि ते मानवबीजाचे असतात. म्हणून शक्यतोवर सांभाळायचे. हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतोय. बाकी, याचा तर कधी अंतच येत नाही ना!
मनाच्या पर अहिंसा दुसऱ्या खोटया अहिंसेला मानणे याला काय अर्थ ? अहिंसा म्हणजे कोणासाठी खराब विचार पण येत नाही, यास अहिंसा म्हटली जाते. शत्रुसाठी सुद्धा खराब विचार येत नाहीत. शत्रुसाठी सुद्धा त्याचे कल्याण कसे होईल, असा विचार येतो. खराब विचार येणे हा प्रकृती गुण आहे, पण त्याला बदलणे हा आपला पुरुषार्थ आहे. पुरुषार्थाची ही गोष्ट तुम्हाला समजली की नाही समजली?
अहिंसक भाव असणाऱ्याने तीर मारले तरी जरा सुद्धा रक्त निघत नाही आणि हिंसक भावावाल्याने फूल फेकले तरीही रक्त निघेल. बाण आणि फूल इतके इफेक्टिव (परिणामकारक) नाहीत, जितकी इफेक्टिव ही भावना आहे! म्हणून आमच्या एक-एक शब्दात 'कोणाला दुःख न होवो, जीवमात्राला दुःख न होवो' असा भाव आम्हाला निरंतर राहत असतो. जगातील जीवमात्राला या मन -वचन-कायेने किंचितमात्र पण दुःख न होवो, या भावनेनेच 'आमची' वाणी निघालेली असते. वस्तू काम करत नाही, बाण काम करत नाही, फूल काम करत नाही पण भाव काम करत असतो.
हे 'अक्रम विज्ञान' तर काय सांगते? मनाने पण शस्त्र उगारायचे नाही, तर मग आपण काठी कशी उगारु शकतो? या जगातील कोणताही