________________
अहिंसा
की कर्त्याप्रति अनुमोदन करायचे नाही, आणि माझ्या मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला दुःख न होवो. अशी भावना असेल तर तुम्ही अहिंसक झालात! त्यास अहिंसा महाव्रत पूर्ण झाले असे म्हटले जाईल. मनात भावना निश्चित केली, निश्चित केली म्हणजे डिसीजन. म्हणजे आपण जे निश्चित केले आणि त्यास पूर्णपणे सिन्सियर राहिलो, त्या निर्णयावर ठाम राहिलो, त्यास महाव्रत म्हटले जाते. आणि निश्चित केले पण त्यावर ठाम राहिलो नाही तर त्यास अणुव्रत म्हटले जाईल.
९७
सावध व्हा, आहे विषयविकारात हिंसा
भगवंताने जर कधी विषयविकाराच्या हिंसेचे वर्णन केले तर मनुष्य मरून जाईल. लोकांना वाटते की यात काय हिंसा आहे ? आपण कोणावर रागावत तर नाही. पण भगवंताच्या दृष्टीने पाहिले तर त्यात हिंसा आणि आसक्ती दोन्हीही एकत्र येतात, त्यामुळे पाचही महाव्रत तुटतात आणि त्यामुळे खूप दोष लागतात. एकदाच्या विषायामुळे लाखो जीव मरून जातात, त्याचा दोष लागतो. इच्छा नसताना सुद्धा त्यात भयंकर हिंसा आहे. म्हणून रौद्र स्वरूप होऊन जाते.
फक्त विषयविकारामुळेच तर संसार टिकून राहिला आहे. एक हा स्त्रीविषय नसेल ना, तर दुसरे विषय कधीच नडत नाहीत. फक्त या विषयाचा अभाव झाला तरी देवगती मिळेल. या विषयाचा अभाव झाला म्हणजे इतर सर्व विषय, सर्वच ताब्यात येऊन जातात. आणि या विषयात पडला म्हणजे विषयामुळे तो आधी पशुगतीत जातो. विषयाने केवळ अधोगतीच आहे. कारण फक्त एका विषयात तर करोडो जीव मरतात. हे जरी त्याला समजत नसेल तरी पण जोखीमदारी तर ओढवून घेतो ना !
म्हणून जोपर्यंत संसारीपणा आहे, स्त्रीविषय आहे, तोपर्यंत ते अहिंसेसाठी घातकच आहे. त्यातही परस्त्री हे सर्वात मोठे जोखीम आहे. परस्त्री असेल तर नर्काचा अधिकारीच झाला. बस, मग त्याने दुसरे काही शोधूच नये, आणि पुन्हा मनुष्यजन्म मिळेल अशी आशाही ठेवू नये. हीच