________________
अहिंसा
कोणत्याच काळात झाले नव्हते असे या पाचव्या आयत चालले आहे. बुद्धीने मारतात का? माहीत आहे का तुम्हाला?
बुद्धीने मारतात ना तो भयंकर गुन्हा आहे. अजूनही जर हे सोडले, आणि आत्तापर्यंत जे केले त्याचा पश्चाताप केला आणि पुन्हा नव्याने असे केले नाही तरी चांगलेच आहे. नाही तर याचा काही ठिकाणाच नाही. ही बेजबाबदारी आहे.
इतके करा, आणि अहिंसक बना आपण मनात हिंसकभाव ठेवू नये. 'मला कोणाचीही हिंसा करायची नाही' असा पक्का भाव ठेवावा. आणि सकाळच्या प्रहरी बोलावे की, 'प्राप्त मन-वचन-कायेने कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख न होवो.' असा भाव बोलून नंतर संसारी कार्यांची सुरवात करावी. म्हणजे मग जबाबदारी कमी होऊन जाते. नंतर तुमच्या पायाखाली एखादा जीव मारला गेला तरीही तुम्ही जोखीमदार नाहीत. कारण आज तुमचा तसा भाव नाही. भगवंत तुमची क्रिया बघत नाहीत, तुमचा भाव बघतात. निसर्गाच्या खातेवहीत तुमचा भाव बघितला जातो. आणि येथील सरकार येथील लोकांच्या खातेवहीत तुमची क्रिया बघते. लोकांचे खाते तर इथल्या इथेच पडून राहणार आहेत. आणि तिथे तर निसर्गाचे खाते कामी लागेल. म्हणून तुमचा भाव काय आहे तो तपासून बघा.
___म्हणून सकाळच्या प्रहरी असे पाच वेळा बोलल्यानंतर घराबाहेर निघाला तो अहिंसकच आहे. मग तो कुठेही गडबड करून आला असेल तरीही तो अहिंसकच आहे. कारण घरातून निघाला तेव्हा तो निश्चय करून निघाला होता आणि घरी गेल्यावर पुन्हा कुलूप लावून टाकावा. म्हणजे घरी जाऊन असे म्हणावे की घरून निघताना निश्चय करून निघालो तरी दिवसभरात कोणाला काही दुःख झाले असेल तर मी त्याची माफी मागतो. बस एवढेच करायचे. नंतर तुमची जोखीमदारीच नाही ना!
कोणत्याही जीवाची हिंसा करायची नाही, करवून घ्यायची नाही,