________________
अहिंसा
दादाश्री : बस, यासारखी अनंतानुबंधी दुसरी कोणतीच नाही. हे तर उघडपणे सांगितले आहे ना!
बुद्धीने मारतात ते हार्ड रौद्रध्यान प्रश्नकर्ता : पण यात सर्व कर्माचे भेद आहेत की नाही?
दादाश्री : पण हे नाही का समजणार? हे लहान मुलालाही समजेल असे आहे. आपण कंदील घेऊन जात असू आणि त्याच्याजवळ पणती असेल, आणि त्या बिचाऱ्याला अंधारात दिसत नसेल, तर आपण त्याला म्हणतो ना की थांबा काका, मी येतो, कंदील धरतो. कंदील धरतो की नाही धरत? तेव्हा ही बुद्धी सुद्धा लाईटसारखीच आहे. ज्याची कमी बुद्धी असेल त्याला आपण म्हटले की, 'भाऊ, असे नाही, नाही तर तुमची फसवणूक होईल. आणि तुम्ही अशा प्रकारे करा.' पण हे तर लगेच शिकारच करून टाकतात. तावडीत सापडले की लगेच शिकार! म्हणून मी कडक शब्द लिहिले की हार्ड रौद्रध्यान! चार आया कधीच झाले नाही असे या पाचव्या आयात झाले आहे. बुद्धीचा दुरुपयोग करू लागले आहेत. (आरा-कालचक्राचा एक भाग)
आणि हे जे व्यापारी आहेत ते जास्त बुद्धीवाले म्हणून कमी बुद्धी असलेल्यांना मारतच राहतात. जास्त बुद्धीवाला तर, कमी बुद्धी असलेले ग्राहक आले, तर त्यांना लुटतो. कमी बुद्धी असलेल्याकडून काही पण लुटून घेणे यास भगवंताने रौद्रध्यान म्हटले आहे. आणि याचे फळ जबरदस्त नरक म्हटले आहे. म्हणून बुद्धीचा दुरुपयोग करु नये.
बुद्धी ही तर लाईट आहे. मग कोणी अंधारात जात असेल त्याला लाईट दाखविण्याचेही तुम्ही पैसे मागता? अंधारात एखाद्या माणसाजवळ जर छोटासा कंदीलच असेल तर आपण त्या बिचाऱ्याला लाईट नको का दाखवायला? बुद्धीच्या सहाय्याने लोकांनी दुरुपयोग केला ते हार्ड रौद्रध्यान, नरकात जाऊन सुद्धा सुटणार नाहीत. असे हार्ड रौद्रध्यान