________________
अहिंसा
प्रश्नकर्ता : आपल्या इथे एवढेशे लहान मूल सुद्धा अहिंसा पाळत असते, तर ते त्याच्या मागील जन्माचे संस्कार आहेत ना ?
९४
दादाश्री : हो, म्हणूनच ना! संस्काराशिवाय तर असे मिळणारच नाही ना! पूर्व जन्माचे संस्कार आणि पुण्याच्या आधाराने हे मिळाले, पण आता दुरुपयोग केल्याने कुठे जाईल हे माहीत आहे का ? ! आता कुठे जाणार आहे त्याचे काही सर्टिफिकेट आहे का ?
प्रश्नकर्ता : तो तर अहिंसाच पाळत आहे. त्याचा दुरुपयोग कुठे करतोय ?
दादाश्री : याला अहिंसा म्हणूच कसे शकतो ? मनुष्यांसोबत कषाय करणे, यासारखी सर्वात मोठी हिंसाच नाही या जगात. असा एक तरी शोधून आणा की, जो घरात कषाय करत नसेल, हिंसा करत नसेल. हे तर दिवसभर घरात कषाय करणे आणि स्वतःला अहिंसक म्हणवून घेणे हा तर भयंकर मोठा गुन्हा आहे. यापेक्षा तर फॉरेनवाल्यांना एवढे कषाय होत नसतात. कषाय तर जास्त जागृतीवालेच करतात ना ! तुम्हाला हे समजते की जास्त जागृती असणारा कषाय करतो की कमी जागृती असणारा कषाय करतो ? तुम्हाला नाही का वाटत की कषाय करणे हा भयंकर गुन्हा आहे?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे.
दादाश्री : हो, मग यासारखी दुसरी कोणतीच हिंसा नाही. कषाय हीच हिंसा आहे आणि ही अहिंसा तर जन्मजात अहिंसा आहे. पूर्वी फक्त भावनाच केलेली आणि आज ती भावना उदयात आली. म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ, ही हिंसा थांबली तरच हिंसा थांबेल.
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे. हे समजले. शास्त्रातही असे सांगितले आहे. चक्रवर्ती राजा एवढे सारे युध्द करतात, हिंसा करतात तरी सुद्धा त्यांना अनंतानुबंधी कषाय लागत नाहीत. पण जे कुगुरू, कुधर्म आणि कुसाधूनां मानतात त्या लोकांनाच अनंतानुबंधी कषाय बांधले जातात.