________________
अहिंसा
९३
करायची नाही असे त्यांच्या बिलिफमध्ये (मान्यतेत) असते, त्यांच्या दर्शनात असते, ते खूप तीक्ष्ण बुद्धीवाले असतात.
प्रश्नकर्ता : जन्मल्यापासूनच अहिंसेचे पालन करतात म्हणून ते जास्त मृदु म्हटले जातात ना?
दादाश्री : मृदु नाही म्हटले जात. अहिंसा पाळण्याचे फळ आले. फळ स्वरुपात त्यांची बुद्धी वाढली आणि त्या बुद्धीने लोकांना मारत राहिले, बुद्धीने गोळ्या मारल्या. विनाकारण खून केल्याने एका जन्माचे मरण झाले, परंतु बुद्धीने गोळ्या मारल्याने अनंत जन्मांचे मरण होईल.
मोठी हिंसा, लढाईची की कषायची पूर्वीच्या काळी गावात जे शेठ असायचे, ते जास्त बुद्धीमान असायचे ना! गावात जर कुणा दोघांचे भांडण झाले असेल तर शेठ त्यांचा गैरफायदा घेत नसत. ते त्या दोघांनाही आपल्या घरी बोलवायचे आणि दोघांच्या भांडणाचा निकाल लावायचे. आणि वर दोघांना आपल्या घरी जेवू घालायचे. कशा प्रकारे निकाल लावायचे? तर दोघांपैकी एकाने जर सांगितले की, 'साहेब, आता माझ्याजवळ दोनशे रुपये नाहीत, मग मी आत्ताच्या आता कसा देऊ शकेल?' तेव्हा शेठ काय म्हणाचे, 'तुझ्याजवळ किती पैसे आहेत?' तेव्हा तो म्हणतो, 'पन्नासएक आहेत.' तेव्हा शेठ म्हणायचे की, 'मग माझ्याकडून दिडशे घेऊन जा.' म्हणजे असे भांडण मिटवायचे. आणि आता तर लोकांच्या भांडणाचा गैरफायदा घेतील!
मी कोणावर आक्षेप करत नाही. मी संपूर्ण जगाला निरंतर निर्दोषच पाहतो. या सर्व तर व्यावहारिक गोष्टी चालत आहेत. मला शिव्या दिल्या, मारले, चापट्या मारल्या, काहीही केले तरी पण मी जगाला निर्दोषच पाहतो. हे तर मी व्यवहाराविषयी सांगत आहे. व्यवहाराचेच जर समजले नाही तर कधी पार येईल? आणि ज्ञानी पुरुषांकडून समजून घेतल्याशिवाय कामी लागत नाही. बाकी, माझी कोणा बरोबरही भानगड नाही.