________________
अहिंसा
अहिंसेने वाढली बुद्धी असे आहे, हे आर्तध्यान आणि रौद्रध्यान तर मुसलमानांनाही होत असते, ख्रिश्चन लोकांनाही होत असते, सगळ्यांनाच होत असते आणि आपल्या लोकांनाही होत असते. मग त्यात फरक काय आहे? डिफरन्स काय? उलट आपल्या लोकांना तर जास्त होत असते. कारण जीवहिंसेत थोडी मर्यादा ठेवलेली आहे. अहिंसा धर्म पाळतात त्यामुळे जास्त होते. कारण त्याची बुद्धी खूप तेज असते, बुद्धीशाली असतो. आणि दुषमकाळात बुद्धी जितकी जास्त तितके भयंकर पाप बांधतो. आणि जास्त बुद्धी असलेला कमी बुद्धीवाल्याला मारतो सुद्धा.
फॉरेनवाले आणि मुसलमान, कोणीही बुध्दीने मारत नाही. आपले हिंदुस्तानचे लोक तर बुद्धीने मारतात. बुद्धीने मारण्याचे तर कोणत्याच काळात नव्हते. हे तर या काळातच नवीन लफडे सुरु झाले. पण मग बुद्धी असेल तर मारेल ना?! मग बुद्धी कोणाला असते? एक तर जे जीवांचा घात करत नाहीत, अहिंसक धर्म पाळत असतील, सहा कायच्या जीवांची हिंसा करत नसतील, त्यांची बुद्धी वाढते. नंतर कोणी कंदमूळ खात नसेल, त्याची बुद्धी वाढते. तीर्थंकरांच्या मूर्तीचे दर्शन करतात त्यांची बुद्धी वाढते. आणि ही बुध्दी वाढली त्याचा काय लाभ झाला?
प्रश्नकर्ता : या लोकांवर तुम्ही अन्याय करत आहात.
दादाश्री : अन्याय करत नाही. जास्त बुद्धी आहे म्हणून त्यांचे नुकसान होईल, असे मी पुस्तकात लिहिले आहे. जसे आहे तसे नाही सांगितले तर आणखी अधिक चुकीच्या मार्गाने चालतील. बुद्धीने मारणे हा भयंकर गुन्हा आहे. बुद्धी वाढली त्याचा असा दुरुपयोग करायचा असतो का? आणि ज्यांना जागृती कमी आहे ते बिचारे मंदकषायी असतात.
अहिंसा धर्माचे पालन करतात, जन्मतः छोट्या जीवांची हिंसा