________________
अहिंसा
९१
दादाश्री : हो, क्षण-क्षण भयंकर भावमरण, म्हणजे ते काय सांगू इच्छितात ? तसे तर प्रत्येक क्षणी भावमरण नाही, परंतु प्रत्येक समयला भयंकर भावमरण होत असते. पण हे तर स्थूलरुपात लिहिलेले आहे. जेव्हा की हे तर समय-समयचे भावमरण होतच राहिले आहे. भावमरण म्हणजे काय ? की, 'मी चंदुलाल (चंदुलालच्या जागी वाचकाने स्वत: चे नाव समजावे) आहे' हेच भावमरण आहे. जी अवस्था उत्पन्न झाली, ती अवस्था 'मला' झाली, असे मानणे म्हणजेच भावमरण झाले. या सर्व लोकांची रमणता भावमरणातच आहे की, 'हे सामायिक मी केले, हे मी केले. '
प्रश्नकर्ता : तर मग भाव सजीव कशा प्रकारे होऊ शकतात ?
दादाश्री : भाव तसे सजीव नाहीत. भावाचे तर मरण झाले आहे. भावमरणाला निद्रा म्हटले जाते. भावनिद्रा आणि भावमरण हे दोन्ही एकच आहे. या ‘अक्रम विज्ञानात' भाव ठेवतच नाही म्हणून भावमरण होतच नाही, आणि 'क्रमिक' मध्ये तर क्षणोक्षणी सर्वजण भावमरणातच असतात. कृपाळुदेव तर ज्ञानी पुरुष होते ना, म्हणून फक्त त्यांनाच हे समजले. त्यांना असे वाटायचे की, 'हे तर भावमरण झाले. हे भावमरण झाले.' म्हणून ते निरंतर जागृत राहायचे. दुसरे लोक तर भावमरणातच
चालत राहतात.
भावमरणाचा अर्थ काय ? तर स्वभावाचे मरण झाले आणि विभावाचा जन्म झाला. अवस्थेत 'मी' म्हणजेच विभावाचा जन्म झाला. आणि ‘आपण' त्या अवस्थेला पाहतो म्हणजे स्वभावाचा जन्म झाला.
म्हणजे ही पुद्गलहिंसा असेल ना, तिथे सुटण्याचा काही तरी मार्ग निघेल. परंतु आत्महिंसा करणाऱ्याची तर सुटका होतच नाही. लोक असे बारकाईने समजवतच नाहीत ना ! सर्व वरवर समजावतात!