________________
अहिंसा
आणि माणसांची निंदा करणे हे सुद्धा मारण्यासारखेच आहे. म्हणून निंदेत तर पडायचेच नाही. माणसाची निंदा अजिबात करायची नाही, कधीच नाही. ती सुद्धा हिंसाच आहे.
नंतर जिथे पक्षपात आहे तिथे हिंसा आहे. पक्षपात म्हणजे आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे, तिथेही हिंसा आहे. तसे तर अहिंसेचा बिल्ला लावतात की आम्ही अहिंसक माणसं आहोत. आम्ही अहिंसेलाच मानणारे आहोत. पण भाऊ, पहिली हिंसा म्हणजे हा पक्षपात. एवढा शब्द जरी समजला तरी पुष्कळ झाले. म्हणून वीतरागींची गोष्ट समजण्याची गरज आहे.
स्वत:चे भावमरण क्षणोक्षणी संपूर्ण जगातील लोकांना रौद्रध्यान आणि आर्तध्यान आपोआपच होत राहते. त्यासाठी तर काहीच करायचेच नाही. म्हणजे या जगात सर्वात मोठी हिंसा कोणती? तर आर्तध्यान आणि रौद्रध्यान! कारण त्याला आत्महिंसा म्हटली जाते. त्या जीवजंतुंची हिंसा, ती तर पुद्गलहिंसा म्हटली जाते आणि यास तर आत्महिंसा म्हटली जाते. मग कोणती हिंसा चांगली?
प्रश्नकर्ता : हिंसा तर कुठलीही चांगली नाही. परंतु आत्महिंसा ही मोठी हिंसा म्हटली जाईल.
दादाश्री : हे लोक पुद्गलहिंसा तर खूप पाळतात. पण त्यांच्याकडून आत्महिंसा होतच राहते. आत्महिंसेला शास्त्रकारांनी भावहिंसा म्हटली आहे. आता या ज्ञानानंतर तुमची भावहिंसा बंद होते. म्हणूनच आत किती शांती वाटते ना!
प्रश्नकर्ता : कृपाळुदेवांनी या भावहिंसेला भावमरण म्हटले आहे ना? कृपाळुदेवांचे वाक्य आहे, 'क्षण क्षण भयंकर भावमरणे का अहो राची रह्यो.' यात समय-समयचे भावमरण होत असते का? (समयक्षणाचाही अत्यंत छोटा भाग).