________________
अहिंसा
८९
या छोटया जीवजंतुंना मारणे ही द्रव्यहिंसा म्हटली जाते आणि कोणाला मानसिक दुःख देणे, कोणावर क्रोध करणे, रागावणे, हे सर्व हिंसकभाव म्हटले जातात, भावहिंसा म्हटली जाते. लोकांनी जरी कितीही अहिंसेचे पालन केले, तरी पण अहिंसा इतकी सोपी नाही की लवकर पाळली जाईल. आणि दरअसल (वास्तविक ) हिंसा हे क्रोध मन-मायालोभ आहेत. हे तर जिवजंतु मारतात, पारडू मारतात, म्हशी मारतात, ती तर म्हणा द्रव्यहिंसा आहेच. आणि ते निसर्गाने लिहिल्यानुसारच होत राहते. यात कोणाचेही चालत नाही.
म्हणून भगवंताने काय सांगितले होते की प्रथम, स्वतः कडून कषाय होणार नाही असे कर. कारण कषाय ही सर्वात मोठी हिंसा आहे. ती आत्महिंसा म्हटली जाते, भावहिंसा म्हटली जाते. द्रव्यहिंसा झाली तर भले झाली परंतु भावहिंसा मात्र होऊ देऊ नकोस. तेव्हा हे लोक द्रव्यहिंसेला थांबवतात पण भावहिंसा तर चालूच राहते.
म्हणून जर कोणी निश्चत केले की 'मला मारायचे नाहीच' तर त्याच्या वाट्याला कोणी मरायला येणार नाही. आता याने अशी स्थूलहिंसा तर बंद केली की, मला कुठल्याही जीवाला मारायचे नाही. पण मग बुद्धीने मारायचे असे जर निश्चत केले असेल तर त्याचा बाजार उघडाच राहतो. मग तिथे येऊन पाखरं आपटत राहतात, आणि ती सुद्धा हिंसाच आहे ना !
म्हणून कोणत्याही जीवाला त्रास होणार, कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होणार, कोणत्याही जीवाची सहजही हिंसा होणार, असे व्हायला नको. आणि कोणत्याही मनुष्यासाठी जरा सुद्धा वाईट अभिप्राय असायला नको. शत्रुसाठीही अभिप्राय बदलला तरी ती सर्वात मोठी हिंसा आहे. एक बकरा मारला त्याहीपेक्षा ही मोठी हिंसा आहे. घरच्या माणसांवर चिडणे, हे बकरा मारण्यापेक्षाही मोठी हिंसा आहे. कारण चिडणे हा आत्मघात आहे. आणि बकऱ्याचे मरणे ही वेगळी गोष्ट आहे.