________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
अरे, कितीही छान खीर खाल्ली असेल, पण जर उलटी झाली तर ती खीर कशी दिसते? हातात घेऊ शकु अशी सुंदर दिसते का? वाटी स्वच्छ असेल, खीरही छान असेल, पण खाल्ल्यांनतर त्याच खीरीची उलटी झाली, आणि ती जर पुन्हा खायला सांगितली तर तुम्ही खाणार नाही आणि काय म्हणाल की, 'जे व्हायचे असेल ते होऊ दे, पण मी काही खाणार नाही. अर्थात हे सर्व भान राहत नाही ना!!!
पाच इन्द्रियांच्या विषयात फक्त जीभेचा विषयच तेवढा खरा विषय आहे. दूसरे सर्व तर नकली आहेत. शुद्ध विषय असेल तर हा एकच! फर्स्ट क्लास हापूसचे आंबे असतील, तर कसा स्वाद येईल?! भ्रांतीतला जर कोणता शुद्ध विषय असेल तर फक्त हा एकच आहे.
विषय तर संडास आहे. नाकातून, कानातून, तोंडातून या सर्वांमधून जे-जे निघते, ते सर्व संडासच आहे. डिस्चार्ज हे सुद्धा संडासच आहे. जो पारिणामिक भाग आहे, तो संडास आहे परंतु तन्मायाकार झाल्याशिवाय गलन होत नाही.
विचारशील मनुष्याने विषयात सुख कशाप्रकारे मानले आहे, त्याचेच मला नवल वाटते! विषयाचे पृथक्करण केले तर खरुजाला खाजवण्यासारखे आहे. आम्हाला तर खूप-खूप विचार येतात आणि वाटते की अरेरे! अनंत जन्म पुन्हा-पुन्हा हेच केले?! जे काही आपल्याला आवडत नाही, ते सर्वच विषयामध्ये आहे. नुसता दुर्गंध आहे. डोळ्यांना पाहायला आवडत नाही. नाकाने सुंघायला आवडत नाही. तू सुंघून पाहिले का कधी? सुंघून पहायचे होते ना? तेव्हा कुठे वैराग्य येईल. कानालाही आवडत नाही. फक्त त्वचेला आवडते.
विषय हा बुद्धीपूर्वकचा खेळ नाही, ही तर केवळ मनाची पीळ
आहे.
मला तर या विषयात एवढी घाण दिसते की मला अजिबात, जरा सुद्धा त्या बाजूचा विचार येत नाही. मला कधीही विषयासंबंधी विचार येतच नाहीत. मी (ज्ञानात) इतके सर्व पाहिले आहे की मला मनुष्य आरपार दिसतात.