________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
लग्न हे तर खरोखरचे बंधन आहे. म्हशीला गोठ्यात कोंडण्यासारखी अवस्था होते. अशा झंझटीत फसू नये हे उत्तम, फसले असाल तरी त्यातून सूटता आले तर अति उत्तम आणि नाहीच तर शेवटी फळ चाखल्यानंतर तरी निघून जायला हवे!!!
एक भाऊ मला सांगत होता की, माझ्या बायकोशिवाय मला ऑफिसमध्ये करमत नाही.' अरे, जर कधी तिच्या हाताला पू झाला तर तू चाटशील का? नाही? मग काय बघून स्त्रीवर मोहित होतोस?! संपूर्ण शरीरच पू ने भरलले आहे. ही गोणी (शरीर) कशाची आहे, याचा विचार नाही येत का? मनुष्याला आपल्या पत्नीवर प्रेम आहे त्याहीपेक्षा, जास्त प्रेम डुक्कराला डुक्करीनीवर असते. याला काय प्रेम म्हणायचे?
ही तर निव्वळ पाशवताच आहे! प्रेम कशास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि कधी कमीही होत नाही, त्याला प्रेम म्हणतात. ही तर सर्व आसक्ति आहे.
विषयभोग तर मात्र खरकटेच आहे. संपूर्ण जगाचे खरकटे आहे. आत्म्याचा आहार असा असेल का? आत्म्याला बाहेरील कोणत्याही वस्तुची आवश्यकता नाही, आत्मा तर निरालंब आहे. कोणत्याही अवलंबनाची त्याला गरज नाही.
भ्रांतीरसात हे जग एकाकार झाले आहे. भ्रांतीरस म्हणजे खरोखर रस नाही, तरीही मानून घेतले आहे! न जाणो काय मानून घेतले आहे! ह्या सुखाचे जर वर्णन करायला गेलो तर माणसाला उलट्या येऊ लागतील !!!
या शरीराची राख तयार होते, आणि ह्या राखेच्या परमाणूं पासून पुन्हा नवीन शरीर तयार होते. अशा अनंत जन्माच्या राखेचा हा परिणाम आहे. फक्त खरकटेच आहे! हे खरकट्याचे खरकटे आणि त्याचेही पुन्हा खरकटे! त्याची तीच राख, तेच परमाणू सर्व त्यातूनच पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. भांडयाला दुसऱ्या दिवशी घासले तर स्वच्छ दिसतात पण जर घासल्याशिवाय रोज त्यातच खात राहिलो तर ते घाणेरडे नाही का?