________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मनुष्याला रोंग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे की, विषयात सुख आहे. आता जर त्याला विषयापेक्षाही उच्च सुख मिळाले तर विषयात सुख वाटणार नाही! खरे तर विषयात काहीच सुख नाही पण देहधारीला व्यवहारात सुटकाच नाही. नाही तर जाणून बुजून गटारीचे झाकण कोण उघडेल? विषयात जर सुख असते तर चक्रवर्ती राजे इतक्या सर्व राण्या असूनही सुखाच्या शोधात निघाले नसते! या ज्ञानाने तर इतके उच्च प्रकारचे सुख मिळते. तरी सुद्धा हे ज्ञान मिळाल्यानंतर लगेचच विषय जात नाहीत. पण हळूहळू निघून जातात. पण तरी स्वतःने मात्र असा विचार तर करायला हवा की विषयात किती घाण आहे!
पुरुषाला स्त्री आहे असे दिसत असेल तर पुरुषात रोग आहे म्हणूनच 'स्त्री' आहे असे दिसते. पुरुषात रोग नसेल तर त्याला स्त्री दिसत नाही. (केवळ त्याचा आत्माच दिसतो)
कित्येक जन्मांपासून मोजले तर पुरुषांनी कितीतरी स्त्रियांशी लग्न केले आणि स्त्रियांनीही पुरुषांशी लग्न केले पण तरीही अजून त्यांचा विषयाचा मोह तुटत नाही. तेव्हा यातून ते केव्हा पार येतील?! त्यापेक्षा होऊन जा एकटे म्हणजे मग कायमची झंझटच मिटून जाईल ना?!
खरे तर ब्रह्मचर्य हे समजून पाळणे योग्य आहे. ब्रह्मचर्याचे फळ जर मोक्ष मिळत नसेल तर ते ब्रह्मचर्य सर्व खच्ची केल्यासारखेच आहे. पण तरीही ब्रह्मचर्याने शरीर निरोगी राहते, बळकट होते, सुंदर होते, आयुष्य वाढते! बैल सुद्धा धुष्टपुष्ट होऊन जगतो ना?
प्रश्नकर्ता : लग्न करण्याची इच्छाच होत नाही मला. दादाश्री : हो का? मग लग्न केल्याशिवाय चालेल?
प्रश्नकर्ता : हो, माझी तर ब्रह्मचर्याचीच भावना आहे. त्यासाठी खूप शक्ति द्या, समज द्या मला.
दादाश्री : त्यासाठी भावना करावी लागते. तू दररोज बोलायचे की, 'हे दादा भगवान! मला ब्रह्मचर्य पाळण्याची शक्ति द्या!' आणि जर विषयाचा विचार आला तर त्यास लगेच उपटून टाकायचे. नाहीतर